दुचाकी अपघातात एक ठार; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:08 AM2018-05-29T01:08:58+5:302018-05-29T01:08:58+5:30

डोमरूळ: येथील विनेश साहेबराव पडोळ (वय ४३) या तरुण शेतकर्‍याचा चिखली येथील लग्नसमारंभ आटोपून परतताना हॉटेल स्वरंजलीजवळ अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ९.४५ वाजता घडली. या अपघातात एक गंभीर जखमी झाला असून, डोमरूळ गावावर शोककळा पसरली आहे.

One killed in a bike accident; One injured | दुचाकी अपघातात एक ठार; एक जखमी

दुचाकी अपघातात एक ठार; एक जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देचिखलीजवळ झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
डोमरूळ: येथील विनेश साहेबराव पडोळ (वय ४३) या तरुण शेतकर्‍याचा चिखली येथील लग्नसमारंभ आटोपून परतताना हॉटेल स्वरंजलीजवळ अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ९.४५ वाजता घडली. या अपघातात एक गंभीर जखमी झाला असून, डोमरूळ गावावर शोककळा पसरली आहे.
बुलडाणा तालुक्यातील डोमरूळ येथील विनेश साहेबराव पडोळ आणि मनोहर किसन पडोळ हे दोघे चिखली येथील लग्नसमारंभ आटोपून रविवारी रात्री ९:४५ दरम्यान आपल्या मोटारसायकलने परतत असताना समोरून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. लग्नसमारंभ जवळच असल्यामुळे त्या दोघांना लवकरच दवाखान्यात नेण्यात आले. दोघांच्याही पायाला,  डोक्याला गंभीर इजा झाली असल्यामुळे औरंगाबाद नेत असताना बदनापूरजवळ विनेश पडोळ यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या पश्यात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई, वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे. विनेश पडोळ यांच्या निधनाची बातमी कळताच गावातील तरुण होतकरू शेतकरी जाण्याने शोककळा पसरली.  या अपघाताची नोंद चिखली पोलीस स्टनेशनला करण्यात आली असून, अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: One killed in a bike accident; One injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.