निरूपमा डांगे बुलडाण्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 05:32 PM2018-04-16T17:32:56+5:302018-04-16T17:32:56+5:30

बुलडाणा : जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी सोमवारी प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. 

Nirupama Dange, the first woman's collector of Buldhana |  निरूपमा डांगे बुलडाण्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी

 निरूपमा डांगे बुलडाण्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी

googlenewsNext
ठळक मुद्देडॉ.निरूपमा डांगे ह्या बुलडाणा जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेणार आहेत. डॉ.पुलकुंडवार यांचा जवळपास एक वर्षाचा प्रशासकीय कार्यकाळ शिस्त, शातंतेत गेला.


बुलडाणा : जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी सोमवारी प्रशासकीय बदली करण्यात आली आहे.  त्यांच्याजागी नवे जिल्हाधिकारी म्हणून नागपूर येथील महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.निरूपमा डांगे येणार आहेत. डॉ.निरूपमा डांगे ह्या बुलडाणा जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी म्हणून २६ एप्रिल २०१७ रोजी पदभार स्वीकारला होता. डॉ.पुलकुंडवार यांचा जवळपास एक वर्षाचा प्रशासकीय कार्यकाळ शिस्त, शातंतेत गेला. डॉ. पुलकुंडवार यांची कामाबद्दलची असलेली सकारात्मता जिल्ह्याच्या विविध विकास योजनांच्या पाठपुराव्यासाठी मोलाची ठरली. जिल्हा दुष्काळमुक्त झाला पाहिजे यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून त्यांनी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून बुलडाणा जिल्हा सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी
पुढाकार घेतला.

Web Title: Nirupama Dange, the first woman's collector of Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.