लोणार तहसीलची ‘आयएसओ’कडे वाटचाल; नामांकनासाठी प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 01:38 PM2018-04-23T13:38:59+5:302018-04-23T13:38:59+5:30

लोणार : तहसील कार्यालयात एखाद्या कागदपत्रासाठी जायचे म्हटले, की अनेकांच्या माथ्यावर आठ्या पडतात; मात्र याला जागतिक स्तरातील पर्यटन केंद्र असलेले लोणार तहसील कार्यालय अपवाद असल्याचे येथील कामकाजावरून, वातावरणावरून दिसून येते. त्यामुळे लोणार तहसील कार्यालयाची ‘आयएसओ’कडे वाटचाल सुरू असून, नामांकनासाठी अधिकारी वर्ग प्रयत्न करीत आहे.

Lonar tahsil moves towards 'ISO'; Nomination efforts | लोणार तहसीलची ‘आयएसओ’कडे वाटचाल; नामांकनासाठी प्रयत्न 

लोणार तहसीलची ‘आयएसओ’कडे वाटचाल; नामांकनासाठी प्रयत्न 

Next
ठळक मुद्दे तहसील कार्यालयात कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांसाठी प्रवेशद्वारावर प्रथम शुद्ध पाणी व प्रशस्त बसण्याची व्यवस्था केलेली आहे. इमारत परिसरात झाडांच्या कुंड्या लावल्याने आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. कामकाजाच्या कागदपत्रांची व्यवस्थित मांडणी करून विविध विभागांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.


- किशोर मापारी
लोणार : तहसील कार्यालयात एखाद्या कागदपत्रासाठी जायचे म्हटले, की अनेकांच्या माथ्यावर आठ्या पडतात; मात्र याला जागतिक स्तरातील पर्यटन केंद्र असलेले लोणार तहसील कार्यालय अपवाद असल्याचे येथील कामकाजावरून, वातावरणावरून दिसून येते. त्यामुळे लोणार तहसील कार्यालयाची ‘आयएसओ’कडे वाटचाल सुरू असून, नामांकनासाठी अधिकारी वर्ग प्रयत्न करीत आहे.
लोणार तहसील कार्यालयात कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांसाठी प्रवेशद्वारावर प्रथम शुद्ध पाणी व प्रशस्त बसण्याची व्यवस्था केलेली आहे. कामासाठी लागणारी कागदपत्रे, कोणाला भेटायचे, याचे माहितीफलक तसेच माहिती देण्यासाठी कर्मचाºयांची नियुक्ती केलेली आहे. कार्यालय परिसरात वृक्ष लागवड केली असून, इमारत परिसरात झाडांच्या कुंड्या लावल्याने आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. कागदपत्रे मिळण्यासाठी अवधी असल्यास नागरिकांना मनोरंजनासाठी टीव्ही संच लावलेला आहे. तसेच वाचनासाठी विविध वृत्तपत्रे, पुस्तके ठेवण्यात आलेली आहे. भिंतीवर विविध योजनांची माहिती देणारे फलक लावण्यात आली आहेत. सुविचार तसेच थोर व्यक्तीच्या विचारांचे फलक लावण्यात आलेले आहे. कार्यालयीन कामकाजाच्या कागदपत्रांची व्यवस्थित मांडणी करून विविध विभागांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामुळे कर्मचाºयांना कामे करणे सोपे आणि सुलभ झाले असून, कामाची गती वाढल्याचे दिसून येत आहे. तक्रारपेटी, शौचालय, सुव्यवस्थित कागदपत्रे, विविध विभागांना दिलेली नावे व ओळखपत्र परिधान केलेले अधिकारी व कर्मचारी, पक्ष्यांसाठी घरटे व पार्किं ग व्यवस्था अशा अनेक सुविधांमुळे लोणार तहसील कार्यालय लक्ष वेधून घेत आहे.
‘आयएसओ’ नामांकनासाठी प्रयत्न
लोणार तहसील कार्यालयात मिळत असलेल्या सुविधा, येथील अधिकारी व कर्मचाºयांचे कामकाज, प्रशस्त इमारत अशा विविधतेमुळे आयएसओ नामांकनसाठी तहसील कार्यालयाचे प्रयत्न सुरू आहेत.


ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सर्व सुविधा प्राप्त व्हाव्यात व योजनांची माहिती मिळावी, हा उद्देश आहे. शासकीय कार्यालयात येणाºयांचा सकारात्मक दृष्टिकोन होत असल्याने समाधान वाटत आहे.
- सुरेश कव्हळे, तहसीलदार, लोणार.

Web Title: Lonar tahsil moves towards 'ISO'; Nomination efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.