लायडार तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होतेय बुलडाणा शहराचे सर्वेक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:09 AM2017-12-28T00:09:54+5:302017-12-28T00:17:43+5:30

बुलडाणा :  चतुर्थकरमुल्यांकन (आता पंचवार्षिक) खो देत शहरातील मालमत्तांच्या कर आकारणीत कथितस्तरावर गैरप्रकार करणार्यांना आता चांगलाच चाप बसणार असून मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातंर्गत बुलडाणा शहरातील मालमत्तांचे आता ३६0 डिग्रीमध्ये लायडार तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बाह्य सर्व्हेक्षणास बुधवारपासून प्रारंभ झाला आहे.

Lludar Technology Survey of Buldana City | लायडार तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होतेय बुलडाणा शहराचे सर्वेक्षण!

लायडार तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होतेय बुलडाणा शहराचे सर्वेक्षण!

Next
ठळक मुद्देतंत्रज्ञानाचा खुबीने वापर ३६0 डिग्रीमध्ये मालमत्तांचे बाहय़ सर्वेक्षणकर चुकवेगिरीला बसेल आळा

नीलेश जोशी। 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  चतुर्थकरमुल्यांकन (आता पंचवार्षिक) खो देत शहरातील मालमत्तांच्या कर आकारणीत कथितस्तरावर गैरप्रकार करणार्यांना आता चांगलाच चाप बसणार असून मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातंर्गत बुलडाणा शहरातील मालमत्तांचे आता ३६0 डिग्रीमध्ये लायडार तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बाह्य सर्व्हेक्षणास बुधवारपासून प्रारंभ झाला आहे.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या (महाआयटी) अंतर्गत हे  सर्व्हेक्षण करण्यात येत असून बुलडाणा शहरात आगामी २0 दिवस ते केले जाणार आहे. सोबतच जीएसआय मॅपींगचीही त्याला जोड मिळणार असल्याने मालमत्तांच्या कर चुकवेगिरीला त्यामुळे लगाम बसणार आहे. यामध्ये रस्त्यावरून चालणार्या चारचाकी वाहनामध्ये अत्याधुनिक यंत्राचा ३६0 डी कॅमेरा आणि स्कॅनिंगद्वारे मालमत्तांचे सर्व्हेक्षण     केले जात आहे. राज्यात काही     मनपा, पालिका आणि नगर पंचायतीमध्ये याची सुरूवात झाली आहे. त्यादृष्टीने  बुलडाणा हे दुसरे शहर ठरले आहे.

बुलडाण्यात १५ हजार मालमत्ता
बुलडाणा शहरात जवळपास १५ हजार मालमत्ता असून गेल्या दहा वर्षात या मालमत्तांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र चतुर्थ कर मुल्यांकनाला वारंवार खो मिळत असल्याने प्रत्यक्षातील मालमत्ता किती याचा अंदाज येत नाही. त्यामुळे करचुकवेगीरी वाढली आहे. सोबतच बांधकाम क्षेत्राच्या तुलनेत कमी करक आकारण्याचे प्रकार घडत आहेत. या तंत्रज्ञानातून तयार डिजीटल छायाचित्रांमुळे आता ही कर चुकवेगिरी करता येणार नाही.

शिर्डीतही झाले सर्वेक्षण
नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे लायडार तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण नुकतेच पूर्ण करून चार जणांची ही टिम सध्या बुलडाण्यात आली आहे. २0 दिवस हे सर्वेक्षण चालणार असून सुमारे १४ चौरस किमीचा विस्तार असलेल्या बुलडाणा शहरातील गल्ली बोळात जाऊनही दुसर्या टप्प्यात सर्व्हे होईल.

Web Title: Lludar Technology Survey of Buldana City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.