आर्थिक व्यवहार निवडणूक विभागाच्या रडारवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 05:51 PM2019-03-12T17:51:22+5:302019-03-12T17:51:44+5:30

बुलडाणा: १७ व्या लोकसभा निवडणुकीत आयकर विभागासह निवडणूक विभागाची जिल्ह्यात होणार्या मोठ्या आर्थिक व्यवहारांवर करडी नजर राहणार आहे.

Financial transactions on the radar of Election Department! | आर्थिक व्यवहार निवडणूक विभागाच्या रडारवर!

आर्थिक व्यवहार निवडणूक विभागाच्या रडारवर!

Next

- नीलेश जोशी

बुलडाणा: १७ व्या लोकसभा निवडणुकीत आयकर विभागासह निवडणूक विभागाची जिल्ह्यात होणार्या मोठ्या आर्थिक व्यवहारांवर करडी नजर राहणार आहे. दहा लाख रुपयांच्या आसपास होणारे सर्व व्यवहार हे संशयास्पद गृहीत धरण्यात येणार असून त्याची थेट आयकर खात्याच्या माध्यमातून चौकशी करण्यात येवून त्यातील तथ्ये तपासण्यात येणार आहे. दरम्यान, २० हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचे व्यवहार उमेदवारांना करावयाचे असल्यासे थेट धनादेश त्यांना द्यावा लागणार आहे. एक लाख रुपये जमा किंवा काढल्या गेल्यास त्याचा संपूर्ण तपशील निवडणूक विभागास उमेदवारांना द्यावा लागणार आहे. निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासूनच जिल्ह्यात होणार्या बड्या आर्थिक व्यवहारांवर निवडणूक विभागासह आयकर विभाग बारीक नजर ठेवून आहे. त्यासंदर्भाने लेखा विभागाची तातडीची बैठक अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारपडली असून लेखाधिकारी आर. आर. चव्हाण, कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर, जिल्हा परिषदेचे डेप्युटी कॅफो सचिंग इगे यांच्यासह निवडणूक विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. दरम्यान, विधानसभास्तरावर वर्ग दोनचा एक अधिकारी व वर्ग तीनचे दोन अधिकारी अशी १८ जणांचे पथक निवडणूक काळात जिल्ह्यात होणार्या सर्व आधिक व्यवहारांवर बारकाईने नजर ठेवणार असून उमेदवारांचाही दैनंदिन खर्चाचीही ही पथके पडताळणी करणार आहे. उमेदवारांना त्यांचा खर्च दररोज सादर करावा लागणार असून उमेदवारांना त्यांचे स्वतंत्र बँक खाते यासाठी उघडावे लागणार आहे. गत वेळीप्रमाणेच यावेळीही निवडणूक विभागाची उमेदवारांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर असणार आहे. विशेष म्हणजे दहा लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारावर निवडूक विभाग वॉच ठेवून आहे. त्यासाठी राष्ट्रीयकृत, व्यापारी तथा क्षेत्रीय बँकामध्ये होणार्या व्यवहारांवर नजर ठेवण्यात आली असून त्याचा दररोजचा अहवालही निवडणूक विभागास सादर करावा लागणार आहे.

संशयास्पद व्यवहार

निवडणूक कालावधीत बँकेच्या कोणत्याही खात्यात दहा लाख रुपयांची रककम जमा केल्यास किंवा काढल्या गेल्यास त्या व्यवहारांचा तपशील तपासण्यात येणार आहे. उमेदवाराच्या खात्यातून एक लाख रुपयांची रक्कम काढल्या गेल्यास किंवा जमा केली गेल्यास त्याची सविस्तर माहिती निवडणूक विभाग घेणार आहे. एक प्रकारे मोठ्या रकमेच्या व्यवहाराकडे संशयास्पदपणे पाहल्या जाणार असून त्या व्यवहारांचे बारकावे तपासण्यात येणार आहेत. अशा व्यवहारांची आयकर खात्याकडून गोपनियस्तरावर तपासणी केल्या जाणार आहे.

गतवेळी १०० कोटींचे व्यवहार

गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान बुलडाणा जिल्ह्यात सरासरी दररोज दहा लाख किंवा त्यापेक्षा मोठ्या रकमेचे दहा व्यवहार होत होते. गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीच्या १८ दिवसांच्या काळात तब्बल १०० कोटी रुपयांचे व्यवहार जिल्ह्यात झाले होते. त्याचा तपशीलही निवडणूक विभागाकडे उपलब्ध असून आयकर खात्यानेही या व्यवहारांची तपासणी केली होती.

दररोज घेतली जाणार माहिती

जिल्ह्यात राष्ट्रीयकृत, व्यापारी, क्षेत्रीय बँका आणि पतसंस्थांच्या मिळून ५८९ शाखा असून जिल्ह्यातील पाच लाख ६१ हजार लोकांची खाती त्यात असल्याची माहिती आहे. या बँकांमधील दैनंदिन होणारे मोठे व्यवहार तपासण्यात येणार असून त्याची दररोज जिल्हा अग्रणी बँकेच्या माध्यमातून माहितीही घेण्यात येणार आहे.

Web Title: Financial transactions on the radar of Election Department!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.