विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या, तायडे कॉलनीतील भर दुपारची घटना

By अनिल गवई | Published: April 1, 2024 05:27 PM2024-04-01T17:27:18+5:302024-04-01T17:27:32+5:30

प्राप्त माहितीनुसार, कु.सानिका निलेश वरूडकर असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थीनीचे नाव आहे. सोमवारी सकाळी परीक्षा असल्यामुळे ती नियमित शाळेत गेली. पेपर सोडवून आल्यानंतर दुपारी १२ वाजताच्या सुमारास ती घरी परतली.

Female student commits suicide by hanging, afternoon incident in Taide Colony | विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या, तायडे कॉलनीतील भर दुपारची घटना

विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या, तायडे कॉलनीतील भर दुपारची घटना

खामगाव : इयत्ता आठवीत शिकणार्या एका १४ वर्षीय विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी स्थानिक तायडे कॉलनीत घडली. सोमवारी परीक्षेचा पहिलाच पेपर देऊन आल्यानंतर विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, कु.सानिका निलेश वरूडकर असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थीनीचे नाव आहे. सोमवारी सकाळी परीक्षा असल्यामुळे ती नियमित शाळेत गेली. पेपर सोडवून आल्यानंतर दुपारी १२ वाजताच्या सुमारास ती घरी परतली. काही कालावधीनंतर तीने घराचा दरवाजा आतून बंद केला. काही वेळाने तिचा लहान भाऊ घरी परतला. आतून दरवाजा बंद होता. त्याने दरवाजा वाजविला त्यावेळी कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तो धावतच नातेवाईकांकडे गेला. त्यानंतर तिच्या नातेवाईकानी दरवाजा तोडुन घरात प्रवेश केला असता, सानिका ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आली. तिला त्वरीत सामान्य रूग्णालयात उपचाराथं दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषीत केले. या विद्यार्थीनीने आत्महत्या कशामुळे केली, याचा पोलीस शोध घेत असल्याचे सामान्य रूग्णालय सुत्रांनी सांगितले.
 

Web Title: Female student commits suicide by hanging, afternoon incident in Taide Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.