वीज कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे: प्रादेशिक संचालकांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 02:40 PM2019-07-19T14:40:36+5:302019-07-19T14:40:52+5:30

महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे, असे स्पष्ट निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिले.

Electricity employees stayt at headquartered: Regional Director | वीज कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे: प्रादेशिक संचालकांचे निर्देश

वीज कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे: प्रादेशिक संचालकांचे निर्देश

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीज पुरवठा मिळण्यासाठी देखभाल व दुरुस्तीची कामे नियमितपणे करण्यासोबतच महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे, असे स्पष्ट निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिले.
महावितरणच्या बुलडाणा जिल्ह्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गुुरुवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीनंतर डोणगाव सबस्टेशनला आकस्मिक भेट देत पूर्ण पाहणीअंती देखभाल व दुरुस्तीच्या त्रुटी दूर करण्याकरिता उपाययोजना सुचविल्या. तसेच त्वरित अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. वीज ग्राहकांना योग्य व तत्पर सेवा देणे, त्यांच्यासोबत सौजन्याने वागणे, त्यांच्या तक्रारी ऐकून त्यांचे त्वरीत निराकरण करणे, त्यांच्या फोनला योग्य प्रतिसाद देण्याबाबतही दिलीप गुगल यांनी मार्गदर्शन केले. अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी आठवड्यातून दोन दिवस उपविभागीय कार्यालये आणि शाखा कार्यालयात भेटी देत तेथील बिलिंग, अखंडित वीज पुरवठा आणि उपकेंद्रातून होणाºया ट्रीपिंगचा आढावा घेत त्याची नोंद मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून घेतले जात असल्याचे सुनिश्चित करावे अशा सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीला अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा राहुल बोरीकर, विशाल पिपरे यांच्यासह अधिकारी हजर होते.  


तक्रारींच्या निराकरणासाठी मेळाव्याचे आयोजन
बुलडाणा मंडलांतर्गत असलेल्या उपविभागीय कार्यालये स्तरावर ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी १५ जुलै ते ५ आॅगस्ट दरम्यान मेळावे घेण्याच्या सूचनाही प्रादेशिक संचालकांनी दिल्या.नवीन वीज पुरवठा घेण्याकरिता पैशाचा भरणा करूनही प्रलंबित असलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना प्राधान्याने वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.


लोकप्रतिनिधींना द्यावी कामाची माहिती
उच्चदाब वितरण प्रणाली व सौर कृषीपंप योजनेबाबत ग्राहकांना कार्यालयीन स्तरावर योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात यावे. ग्राहक तक्रार निवारण मेळाव्यातही याबाबत ग्राहकांना मार्गदर्शन करण्यासोबतच महावितरणच्या कामकाजाची, प्रगतीची व काही कारणास्तव वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

Web Title: Electricity employees stayt at headquartered: Regional Director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.