नवनगरांच्या कामांसाठी ड्रोन सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 06:24 PM2019-03-10T18:24:14+5:302019-03-10T18:24:22+5:30

बुलडाणा जिल्ह्यात सावरगाव माळ आणि साब्रा-काब्रा-फैजलपुर परिसरात दोन नवनगर निर्माधीन असून त्याच्यासाठी लागणाऱ्या जमिनीचा दोन दिवसापूर्वी ड्रोन सर्व्हे करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे

Dowry Surveys for new cities | नवनगरांच्या कामांसाठी ड्रोन सर्व्हे

नवनगरांच्या कामांसाठी ड्रोन सर्व्हे

googlenewsNext

- नीलेश जोशी

बुलडाणा: विदर्भाची थेट राज्याच्या आर्थिक राजधानीशी कनेक्टीव्ही वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘समृद्धी’ महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यात सावरगाव माळ आणि साब्रा-काब्रा-फैजलपुर परिसरात दोन नवनगर निर्माधीन असून त्याच्यासाठी लागणाऱ्या जमिनीचा दोन दिवसापूर्वी ड्रोन सर्व्हे करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, सावरगाव माळ येथील हा ड्रोन सर्व्हे पूर्णत्वास गेला असून मोनार्च कंपनीतर्फे तो करण्यात आला आला आहे. यामध्ये संबंधीत जमीनीवर असलेले पीक, जमिनीचा स्तर आणि त्यावर काही स्ट्रक्चर आहे का? याची माहिती उपलब्ध होणार आहे. गोळेगाव, निमखेड, सावरगाव माळ या भागात हा सर्व्हे करण्यात आला आहे. आता पुढील काळात या भागत पिलर मार्किंग करण्यात येणार असून त्यानंतर जमिनीची संयुक्त मोजणी करण्यात येणार आहे. सावरगाव माळ येथील नवनगर कामास प्रथम प्रारंभ होणार असून त्यानंतर मेहकर तालुक्यातील साब्रा-काब्रा-फैजलपुर भागातील नवनगराच्या कामास प्रारंभ होईल. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातूलन ८७.२९ किमी गेलेल्या या महामार्गाच्या कामासाठी नऊ लाख घनमीटर रेतीची अवश्यकता आहे. त्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील भागातील जवळपास २२ रेती घाट हे राखीव ठेवण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. जानेवारी महिन्यात समृद्धी महामार्गाच्या कामासंदर्भात मुंबई येथे एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दहाही जिल्ह्यातील अधिकार्यांची बैठक घेऊन कामासंदर्भात सविस्तर सुचना दिल्या होत्या. त्यानुषंगाने आता ही कामे प्रारंभ झाली आहे. जिल्ह्यातून जाणार्या समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले असून सध्या धावपट्टीचे सपाटीकरण, त्यावरील वृक्ष तोड अशी कामे जवळपास पूर्णत्वास गेली आहे. जमीन समतल करण्यासोबतच लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द येथे लाकडाचा मोठा डेपोही स्थापन करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने मेहकर तालुक्यातील साब्रा-काब्रा-फैजलपूर परिसरात एक नवनगर आणि सिंदखेड राजा तालुक्यात जालना जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या सावरगाव माळ, निमखेड, गोळेगाव परिसरात प्रत्येकी ५०० हेक्टरवर ही नवनगरे (समृद्धी कृषी केंद्रे) उभी राहणार आहे. त्यानुषंगाने हा ड्रोन सर्व्हे करण्यात आला असून पुढील काळात जागेचे मॅपींग करण्यासाठी तो उपयुक्त ठरणार आहे. सोबतच शेतकऱ्यांचे संमतीपत्र घेऊन संपूर्ण नगराच्या सीमाक्षेत्राची आखणी आता करण्यात येईल असे एमएसआरडीसीचे जिल्ह्यातील समन्वयक यांनी सांगितले. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत १००७ हेक्टर क्षेत्र संपादीत करण्यात आले असून खासगी भूसंपादन १२७ हेक्टर होणार आहे. त्याचा वेगही वाढविण्यात आला आहे. मेहकर आणि सिंदखेड राजा या दोन उपविभागातून हा रस्ता जात आहे. या शिघ्रगती महामार्गासाठी आतापर्यंत ९२ टक्के जमीन संपादीत झालेली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

राज्य रस्ते विकास महामंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना

पत्र या महामार्गाच्या कामासाठी जवळपास नऊ लाख घनमीटर रेतीची गरज लागणार असल्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील काही रेती घाट प्रसंगी तीन वर्षासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने जिल्हाधिकारी यांना डिंसेबर २०१८ मध्येच एक पत्र दिले आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासन सध्या नियोजन करीत आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गेल्याच महिन्यात या महामार्गाच्या कामासाठी एक टास्क फोर्सही नियुक्त करण्यात आला असून त्याद्वारे महामार्गाची कामे जलद गतीने करण्याबाबत सुचीत करण्यात आले आहे.

Web Title: Dowry Surveys for new cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.