इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने काढली दुचाकीची अंत्ययात्रा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 04:41 PM2018-05-24T16:41:58+5:302018-05-24T16:45:13+5:30

बुलडाणा : इंधन दरवाढीविरोधात शहर काँग्रेसच्या वतीने मोटारसायकलची अंत्ययात्रा काढून शासनाचा निषेध करण्यात आला.

congress agitation, two-wheeler funeral against the fuel price hike | इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने काढली दुचाकीची अंत्ययात्रा 

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने काढली दुचाकीची अंत्ययात्रा 

Next
ठळक मुद्देगगनाला भिडलेल्या पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करण्याची मागणी करण्यात आली. पेट्रोलचे भाव प्रतिलिटर ८६ रुपये तर डिझेल ७४ रुपयांवर गेले आहे. काँग्रेसचे दत्ता काकस म्हणाले, पेट्रोल, डिझेलची दरवाढ म्हणजे जनतेच्या खिशातून केलेली चोरी आहे.

बुलडाणा : इंधन दरवाढीविरोधात शहर काँग्रेसच्या वतीने मोटारसायकलची अंत्ययात्रा काढून शासनाचा निषेध करण्यात आला. गगनाला भिडलेल्या पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करण्याची मागणी करण्यात आली. पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. आधीच निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी, शेतमजूर होरपळून निघाले आहेत. त्यातच इंधनाचे दर वाढल्याने वाहने चालविणे कठीण झाले आहे. इंधन वाढीमुळे छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांना खीळ बसला आहे. बेरोजगारीचा प्रश्न उग्र रुप धारण करीत आहे. पेट्रोलचे भाव प्रतिलिटर ८६ रुपये तर डिझेल ७४ रुपयांवर गेले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. गेल्या तीन वर्षापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती अत्यंत कमी झाल्या आहेत. तरीही सरकारने नफेखोरी करुन पेट्रोल, डिझेल, गॅस, इंधनचे भाव कमी केले नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता वेठीस धरल्या जात असून आर्थिक पिळवणूक होत आहे. यावेळी बोलताना काँग्रेसचे दत्ता काकस म्हणाले, पेट्रोल, डिझेलची दरवाढ म्हणजे जनतेच्या खिशातून केलेली चोरी आहे. यावरुन सरकारचा नफेखोरीचा उद्देश दिसून येतो. सर्वसामान्यांबाबत मोठ्या घोषणा करायच्या तर दुसरीकडे दरवाढ करुन पैसा उकळायचा असा शासनाचा धंदा सुरु आहे. मोठ्या उद्योगपतींचे चोचले पुरवणारे हे सरकार आहे. सर्वसामान्य जनतेशी त्यांना काहीच घेणे देणे नाही. महागाईत होरपळून निघाल्याने जनता प्रचंड नाराज आहे. शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने गुरुवारी मोटारसायकलची अंत्ययात्रा काढण्यात आली. यामाध्यमातून जनसामान्यांच्या भावनांना वाचा फोडण्यात आली. यावेळी सतीश मेहेंद्रे, सुनील सपकाळ, आकाश दळवी, अ‍ॅड. राज शेख, सुनील तायडे, सुरेश सरकटे, तेजराव सावळे, अनिल वारे, जाकीर कुरेशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: congress agitation, two-wheeler funeral against the fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.