चिखली-देऊळगाव राजा दरम्यान शिवशाही बसला अपघात; तीन जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:41 AM2018-01-11T00:41:09+5:302018-01-11T00:41:36+5:30

देऊळगाव राजा : चालकाचे नियंत्रण सुटल्याने राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही  बस चिखली-देऊळगाव राजा दरम्यान असोला फाट्यानजीक उलटून रस्त्याखाली  गेल्याची घटना १0 जानेवारी रोजी सकाळी घडली. या अपघातामध्ये बसमधील तीन  प्रवासी जखमी झाले.

Chikhli-Deulgaon King; Shivshahi bus accident; Three injured | चिखली-देऊळगाव राजा दरम्यान शिवशाही बसला अपघात; तीन जखमी 

चिखली-देऊळगाव राजा दरम्यान शिवशाही बसला अपघात; तीन जखमी 

Next
ठळक मुद्दे१0 जानेवारी रोजी सकाळी असोला फाट्याजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव राजा : चालकाचे नियंत्रण सुटल्याने राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही  बस चिखली-देऊळगाव राजा दरम्यान असोला फाट्यानजीक उलटून रस्त्याखाली  गेल्याची घटना १0 जानेवारी रोजी सकाळी घडली. या अपघातामध्ये बसमधील तीन  प्रवासी जखमी झाले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वातानुकूलीत शिवशाही बस क्रमांक एमएच-९- ईएम-१५३७ ही नागपूर-औरंगाबाद जाणारी बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण  सुटल्याने सकाळी नऊ वाजता अपघातग्रस्त झाली. असोला जहागीर फाट्यानजीक हा  अपघात होऊन बस उलटली व रस्त्याच्याकडेला घसरली.
या अपघातात तीन प्रवाशांना जबर मार लागला असून, प्रथमोपचारानंतर त्यांना जालना  येथे सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, सहायक पोलीस उपनिरीक्षक  नामदेव बरकड यांच्या तक्रारीवरून बसचालक सुभाष  (रा. औरंगाबाद) याच्या विरोधा त पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाहन निष्काळजीपणे चालवून प्रवाशांच्या जीवि त्वास धोका निर्माण करणे व वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 
 

Web Title: Chikhli-Deulgaon King; Shivshahi bus accident; Three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.