बुलडाणा खरेदी-विक्री समिती कार्यालयाला लावले बेकायदा सील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:57 AM2018-01-29T00:57:53+5:302018-01-29T01:00:40+5:30

बुलडाणा : येथील तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्थेच्या कार्यालयाला जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बेकायदेशीर सील लावण्यात आले असून, याप्रकरणी संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. योग्य कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार खडके यांच्यासह ११ संचालकांनी कृषी मंत्री तथा पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे केली आहे.

Buldana Purchase Committee has leased the illegal seal to the office! | बुलडाणा खरेदी-विक्री समिती कार्यालयाला लावले बेकायदा सील!

बुलडाणा खरेदी-विक्री समिती कार्यालयाला लावले बेकायदा सील!

Next
ठळक मुद्देसंचालक मंडळाचे कृषी मंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : येथील तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्थेच्या कार्यालयाला जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बेकायदेशीर सील लावण्यात आले असून, याप्रकरणी संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. योग्य कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार खडके यांच्यासह ११ संचालकांनी कृषी मंत्री तथा पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे केली आहे.
 जनसंघ ते भाजप असे सतत ५२ वर्षे ताब्यात असलेल्या व पारदर्शक कारभार करणार्‍या या संस्थेला बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याचे यासंदर्भातील निवेदनामध्ये अध्यक्ष नंदकुमार खडके, सखाराम नरोटे, नारायणराव काळूजी सुसर, विठ्ठलराव देशमुख, विनायक गोडबोले, राजाराम कानडजे, अश्रूबा अंभोरे, कडुबा पवार, दगडू माधवराव गाडेकर, देवराव कापरे, कासाबाई धंदर, विद्या गायकवाड यांनी नमूद केले आहे.
१६ जानेवारी रोजी रात्री उशिरा सहकार खात्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी कथित तक्रारीवरून तत्परता दाखवत त्याच दिवशी हे सील लावले. संस्थेचे पदाधिकारी किंवा कर्मचारी नसताना बंद असलेल्या कार्यालयाला पंचनामा न करता सील लावण्यात आल्याचे यासंदर्भातील निवेदनात नमूद केले आहे. यासोबतच अन्य काही बाबींचाही त्यात ऊहापोह करण्यात आला आहे.
दरम्यान, यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

Web Title: Buldana Purchase Committee has leased the illegal seal to the office!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.