Buldana police vehicle accident in Beed district | बुलडाणा पोलिसांच्या वाहनाला बीड जिल्ह्यात अपघात
बुलडाणा पोलिसांच्या वाहनाला बीड जिल्ह्यात अपघात

ठळक मुद्दे सात पोलिस कर्मचारी जखमी जालन्या उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : एका गुन्ह्याच्या तपासात बीड जिल्ह्यात गेलेल्या बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाला गेवराईनजीक अपघात होऊन सात पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान, यातील दोघांना गंभीर मार लागला असून त्यांच्यावर जालना येतील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहे. हा अपघात शनिवारी रात्री घडला. जखमीमध्ये दोन महिला पोलिस कर्मचा-यांचाही समावेश आहे.
या अपघातामध्ये तपास अधिकारी इमरान इनामदार, चालक शेळके, पथकातील राजेश ठाकूर, अत्ताउल्लाखान  राजेश ठाकूर, महिला कर्मचारी आशा मोरे व खिल्लारे  जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर जालना येथे खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.  बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील  सतत वर्दळीचा व मुख्य बाजारपेठेचा रस्ता असलेल्या येथील डीपी रोडस्थित कृष्ण ज्वेलर्स या सराफा दुकानातून दागिन्यांनी भरलेली बॅग लंपास झाल्याची घटना २३ आॅक्टोबर २०१७ रोजी घडली होती. याप्रकरणी सीसी कॅमेºयाच्या आधारे चिखली पोलिसांनी २८ आॅक्टोबर २०१७ रोजी बीड जिल्ह्यातील गेवराई येथून एका महिला आरोपीस अटक केली होती. तर या प्रकरणातील दोन महिला फरार होत्या. दरम्यान फरार आरोपीपैकी एक महिला आरोपी गेवराई येथे आल्याच्या माहितीवरून बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक पोलिस उपनिरीक्षक इमरान इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली शेवराई येथे गेले होते. दरम्यान संबंधित आरोपी महिला न मिळाल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुलडाण्याकडे परत येत असताना शनिवारी रात्री १० वाजता गेवराई शहराबाहेर अंधार असल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची गाडी समोर असलेल्या उसाच्या बैलगाडीला धडकली.  गाडी वेगात असल्यामुळे बैलगाडीतील उस स्थानिक गुन्हे शाखेच्या गाडीचे समोरील काच फोडून आत शिरले. त्यामुळे गाडीतील चालकासह तपास अधिकारी इमरान इनामदार गंभीर जखमी झाले. इमरान इनामदार यांच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर दखापत झाली असून चालक शेळके, पथकातील राजेश ठाकूर, अत्ताउल्लाखान  राजेश ठाकूर, आशा मोरे, खिल्लारे यांनाही जबर मार लागला आहे. गंभीर जखमी इमरान इनामदार यांच्यावर जालना येथील गपपती हॉस्पिटलमध्ये  शस्त्रक्रिया करण्यात येणार असून इतर कर्मचा-यांवर शासकीयसह खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.


Web Title: Buldana police vehicle accident in Beed district
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.