बुलडाणा जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 01:10 AM2017-12-30T01:10:17+5:302017-12-30T01:13:48+5:30

मलकापूर : कर्जमाफीचा प्रश्न ऐरणीवर असतानाच शेतकर्‍यांना कपाशीवरील बोंडअळीने त्रासून सोडले आणि आता मका या पिकापासून अपेक्षा असताना अपेक्षित भाव मिळू शकत नसल्याने शेतकरी अर्थसंकटात सापडला आहे. त्यात ३१ डिसेंबर मका खरेदीसाठी शेवटचा दिवस असून, हजारो क्विंटल मका शेतकर्‍यांच्या घरात पडून आहे. 

In the agrarian crisis of maize farmers in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकरी संकटात

बुलडाणा जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकरी संकटात

Next
ठळक मुद्देखरेदीसाठी आज शेवटचा दिवस भावही मिळेना अन् विक्रीही होईना!

मनोज पाटील। 
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : कर्जमाफीचा प्रश्न ऐरणीवर असतानाच शेतकर्‍यांना कपाशीवरील बोंडअळीने त्रासून सोडले आणि आता मका या पिकापासून अपेक्षा असताना अपेक्षित भाव मिळू शकत नसल्याने शेतकरी अर्थसंकटात सापडला आहे. त्यात ३१ डिसेंबर मका खरेदीसाठी शेवटचा दिवस असून, हजारो क्विंटल मका शेतकर्‍यांच्या घरात पडून आहे. 
सुरुवातीला उडीद मूग, नंतर कपाशी  पिकानेही धोका दिला. त्यात मक्यापासून अपेक्षा होती. मक्याला अपेक्षित भाव मिळू शकला नाही, त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला. जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये नंबर लावूनसुद्धा मका खरेदी केल्या गेला नाही. शासनाने ३१ डिसेंबर २0१७ ही शेवटची तारीख खरेदीसाठी दिली आहे. सध्या प्रत्येक बाजार समितीत मका विक्रीसाठी आणणेले ट्रॅक्टर उभे आहेत. मलकापूर येथील शासकीय मका खरेदी केंद्रावर मका खरेदीवरून गोंधळ निर्माण झाला. दीड महिन्यात तब्बल १४९ शेतकर्‍यांच्या मक्याचे मोजमाप होऊन तब्बल ४४९५ क्विंटल मका खरेदी करून शासकीय गोदामात साठवण्यात आला. येत्या तीन दिवसांत खरेदी केंद्र बंद होणार असल्याने उर्वरित नोंदणी झालेल्या जवळपास ४00 शेतकर्‍यांनी काय करावे, असा प्रश्न त्या मका उत्पादक शेतकर्‍यांना पडला आहे. त्यातच शेतकर्‍यांकडून आलेला मका हा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मोकळ्या स्वरूपात असला तर २0 रुपये प्रतिक्विंटल व बारदानामध्ये भरून आणला असला तर ३0 रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे हमाली दर शेतकर्‍यांकडून घेतल्या जातो. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे शासनाकडून सुतळीचा पुरवठा करण्यात आलेला असतानाही हमाल मात्र १00 कट्टय़ांमागे एक किलो सुतळीचे दर म्हणून ८0 रुपये शेतकर्‍यांकडून वसूल करतात. जाब विचारल्यास हमाल व शेतकर्‍यांमध्ये बर्‍याचदा वाद विवाद निर्माण होऊन गोंधळाची परिस्थिती या गोदामावर अनेकदा उद्भवलेली आहे.या प्रकारामुळेच अद्यापपावेतो नोंदणी झालेल्या शेतकर्‍यांपैकी केवळ १४९ शेतकर्‍यांकडून ४४९५ क्विंटल मका हा १४२५ रुपये प्रतिक्विंटल दराने या खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आला आहे. अशा बेताच्या परिस्थितीतच ३0 डिसेंबर रोजी शासकीय मका खरेदी केंद्र बंद होणार आहे, असे असले तरी गोदामावर मोजमाप खरेदी प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे.

खरेदी संथ गतीने 
१९ नोव्हेंबर ते २६ डिसेंबरदरम्यान जवळपास ५५0 मका उत्पादक शेतकर्‍यांनी महाराष्ट्र शासन भरड धान्य खरेदी (मका) केंद्रांतर्गत ऑनलाइन पद्धतीने मका विक्रीकरिता नोंदणी केली. दरम्यान, या मका खरेदी केंद्रावर दररोज ३0 ते ४0 नोंदणीकृत शेतकर्‍यांना मोबाइलद्वारे मेसेज देऊन मका विक्रीकरिता बोलाविल्या जात आहे.

मोजमापासाठी हमालाची कमतरता!
मलकापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ स्थित असलेल्या मका गोदामावर मका मोजमाप करणारा इलेक्ट्रिक काटाऐवजी जम्बो तराजू काटा वापरल्या जात आहे. त्याचप्रमाणे केवळ ७ ते ८ हमाल येथे शेकडो क्विंटल मक्याचे मोजमाप करतात. ही हमालाची उणीवही मोजमाप प्रक्रियेत अडसर ठरवून या प्रक्रियेला संथ गती प्राप्त होत आहे.

Web Title: In the agrarian crisis of maize farmers in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.