तीन जीव गेल्यानंतर पालिकांना जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 04:44 PM2019-09-21T16:44:42+5:302019-09-21T16:46:02+5:30

मेहकरातील दुर्घटनेनंतर इतर पालिकांकडून माहिती गोळा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

After three lives are gone, wake up the municipality | तीन जीव गेल्यानंतर पालिकांना जाग

तीन जीव गेल्यानंतर पालिकांना जाग

Next

- ब्रम्हानंद जाधव 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: दिडशे वर्ष जुन्या असलेल्या इमारतीने मेहकर शहरात तीन बळी घेतल्यानंतर जिल्ह्यातील नगर पालिकांना जाग आल्याचे वास्तव शुक्रवारी पाहावयास मिळाले. नगर पालिकांकडे शहरातील धोकादायक घरे, इमारतींची माहिती उपलब्ध नाही; परंतू मेहकरातील दुर्घटनेनंतर इतर पालिकांकडून माहिती गोळा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
जिल्ह्यात १०० ते १५० वर्षापूर्वीची घरे, ब्रिटीश कालीन इमारती आजही वापरात आहेत. काही ठिकाणी तर शासकीय कामकाजही ब्रिटीश कालीन इमारतींमधे सुरू आहे. धोकादायक इमारतीने मेहकर शहरातील तीन बळी गेल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर इतर पालिकांमधील परिस्थिती पाहली असता, शहरातील धोकादायक इमारतींची अथवा घरांची कुठलीच माहिती पालिकांकडे उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले. यासंदर्भात कुठलाही सर्वे आजपर्यंत झाला नाही; तर काही मुख्याधिकाऱ्यांनी धोकादायक इमारतीची माहिती आता घेऊ, असे सांगितले. पालिकांच्या दुर्लक्षामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न आजही अधांतरीच राहत आहे.


काय म्हणतात मुख्याधिकारी..?
मेहकर शहरातील धोकादायक इमारतींबाबत माहिती उपलब्ध नाही. सर्वे करून माहिती घेण्यास संबंधीत अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
- सचिन गाडे
मुख्याधिकारी, न. प. मेहकर.
सिंदखेड राजा शहरात दोन इमारती धोकादायक वाटत होत्या. त्यांना तेंव्हाच नोटीस देण्यात आल्या. आता सर्वे करण्यात येईल.
- धनश्री शिंदे,
मुख्याधिकारी, सिंदखेडराजा
धोकादायक इमारती संदर्भात स्ट्रक्चरल आॅडीट झालेले नाही. परंतू लोणार शहरामध्ये धोकादायक अशा इमारती किंवा घरे नाहीत.
- विठ्ठल केदारे,
मुख्याधिकारी, न. प. लोणार.
देऊळगाव राजा शहरामध्ये तीन घरे धोकादायक होती त्यांना तातडीने नोटीस देण्यात आलेल्या आहेत. धोकादायक इमारती नाहीत.
- निवेदीता घारगे,
मुख्याधिकारी, देऊळगाव राजा

Web Title: After three lives are gone, wake up the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.