शालेय विद्यार्थी बनले ‘स्वच्छता दूत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 11:24 PM2017-09-13T23:24:48+5:302017-09-13T23:25:06+5:30

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांवर स्वच्छतेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या अनुशंगाने १ ते १५ सप्टेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवाडा राबविण्यात येत आहे.

School students became 'Sanitary messenger' | शालेय विद्यार्थी बनले ‘स्वच्छता दूत’

शालेय विद्यार्थी बनले ‘स्वच्छता दूत’

Next
ठळक मुद्देजनजागृती : एक हजार विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांवर स्वच्छतेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या अनुशंगाने १ ते १५ सप्टेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवाडा राबविण्यात येत आहे. या पंधरवाड्यासाठी शालेय विद्यार्थी आता स्वच्छता दूतची भूमिका निभविणार आहे.
लाखनी तालुक्यातील सावरी (मुरमाडी) येथील सिद्धार्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांची आज जनजागृती दिंडी काढण्यात आली. या दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेची माहिती व त्याचे उपयोग समजावून सांगितले. विद्यालयाचे प्राचार्य धनंजय तिरपुडे, विकास बडवाईक यांच्या मार्गदर्शनात ही जनजागृती दिंडी काढण्यात आली. यावेळी गावातील मुख्य रस्त्याने काढलेल्या या रॅलीत शिक्षकांसह ग्रामस्थही सहभागी झाले होते.
इयत्ता ५ वी ते १२ पर्यंतचे शिक्षण विद्यार्थी येथे घेत आहे. १,०८० पट संख्येच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जनजागृतीसाठी दिंडीच्या माध्यमातून दिलेला संदेश स्वच्छता दूत म्हणून ओळखला गेला. या दिंडीत भागवत नान्हे, विनोद मेश्राम, धिरज मेश्राम, बाबुराव गहाणे, दिलीप भैसारे, हमीद मेमन, डी.पी. तिरपुडे, ठाकरे, के.एन. रामटेके, पी.पी. अगळे, एच.एस. गभने, के.पी. साठवणे, एस.वाय. कानतोडे, एस.डी. वासनिक यांचा समावेश होता.

Web Title: School students became 'Sanitary messenger'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.