नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्प जागतिक दर्जाचे होणार

By admin | Published: March 12, 2017 12:42 AM2017-03-12T00:42:01+5:302017-03-12T00:42:01+5:30

नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्प जागतिक दर्जाचे करण्याकरिता हालचाली सुरू झाल्या आहेत.

Nagzira-Navegaon tiger project will be world-class | नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्प जागतिक दर्जाचे होणार

नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्प जागतिक दर्जाचे होणार

Next

नाना पटोले यांचा पुढाकार : अमेरिकन कंपनी करणार गुंतवणूक
भंडारा : नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्प जागतिक दर्जाचे करण्याकरिता हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या निधी व्यतिरिक्त अमेरिकन कंपनी गुंतवणुक करणार असल्याची माहिती खासदार नाना पटोले यांनी दिली. या प्रकल्पाकरिता राज्य शासन १०० कोटी तर केंद्र शासनाकडे ६०० कोटी रूपयांची त्यांनी मागणी केली आहे.
नागझीरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पाला जागतिक दर्जा प्राप्त व्हावा याकरिता योजना आखण्यात आली आहे. ही योजना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना खासदार नाना पटोले यांनी सांगितली. सरकारने ग्लोबल निविदा काढलेली तर अमेरिकेची कंपनी कोटी खर्च करून नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्प जगाच्या पर्यटन स्थळावर येईल. याकरिता राज्य सरकारने १०० कोटी तर केंद्र सरकारने ६०० कोटी देण्याची गरज आहे.
नागझिरा व नवेगाव जंगल ताडोबा पेक्षा घनदाट आहे. या जंगलात रानटी कुत्र्यांचा हैदोस असल्याने वाघ एका ठिकाणी राहत नाही. त्यामुळे पर्यटक इकडे वळत नाही. नद्या जोडण्यात येतील, पर्यटन सुविधा तयार करण्यात येईल, जगाचे पर्यटक याकडे आकर्षित होतील. राज्य शासनाने प्रथम या प्रकल्पाकरिता किमान २०० कोटींचा निधी मंजूर करण्याची मागणी खा. पटोले यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांचेकडे केली आहे. केंद्र शासनाकडे याकरिता पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाघांना नवेगाव-नागझिरा जंगलात सुरक्षित विझर करता यावे करिता प्रयत्न आहे. या दोन्ही जंगलात वाघांची संख्या जास्त आहे. वाघांच्या सुरक्षेकरिता विदेशी कंपनीची मदत घेतली जाईल. नागझिरा नवेगाव व्याघ्र प्रकल्पात जागतिक सोयी सुविधा उपलब्ध झाल्यास बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होईल.
याकरिता राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री ना. मुनगंटीवार यांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे खासदार नाना पटोले यांनी सांगितले. नागपूर भेटीदरम्यान ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Nagzira-Navegaon tiger project will be world-class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.