मोहाडी पंचायत समितीत पदाधिकाऱ्याची आदळआपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:49 AM2019-06-02T00:49:42+5:302019-06-02T00:50:35+5:30

सत्तेचा माज चढला की, मानवी विकृती आपोआप तयार होते. मनावर ताबा नसतो. अगदी असाच प्रकार मोहाडी पंचायत समितीमध्ये अनेकांनी अनुभवला. एका पदाधिकाऱ्याने अधिकाऱ्यांच्या दारावर लाथा मारून संताप व्यक्त केला. सगळ्या मर्यादा सोडलेल्या त्या पदाधिकाऱ्याने अधिकाऱ्यांच्या नावाने अतिशय घाणेरड्या शिव्यांची लाखोळी वाहली.

Mohali Panchayat Samiti official's official appointment | मोहाडी पंचायत समितीत पदाधिकाऱ्याची आदळआपट

मोहाडी पंचायत समितीत पदाधिकाऱ्याची आदळआपट

googlenewsNext
ठळक मुद्देअसभ्य वर्तणुकीतून व्यक्त केला संताप । गटविकास अधिकाऱ्याच्या कक्षाबाहेर प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : सत्तेचा माज चढला की, मानवी विकृती आपोआप तयार होते. मनावर ताबा नसतो. अगदी असाच प्रकार मोहाडी पंचायत समितीमध्ये अनेकांनी अनुभवला. एका पदाधिकाऱ्याने अधिकाऱ्यांच्या दारावर लाथा मारून संताप व्यक्त केला. सगळ्या मर्यादा सोडलेल्या त्या पदाधिकाऱ्याने अधिकाऱ्यांच्या नावाने अतिशय घाणेरड्या शिव्यांची लाखोळी वाहली.
या प्रकाराने पंंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची हकीकत सांगितली. तीन प्रमुख अधिकारी पंचायत समितीमध्ये अनुपस्थित होते. हे अधिकारी कुठे गेले याची शहानिशा न करता त्या पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात संताप शिरला. मग काय गटविकास अधिकाºयांच्या दारावर लात मारत अधिकाऱ्यांचे नाव घेत शिवीगाळ केली. संतापाचा पारा खाली येईपर्यंत पंचायत समितीत आदळआपट सुरु होती. हा सगळा प्रकार काही कर्मचारी निमुटपणे बघत होती. त्या पदाधिकाऱ्यांच्या संतापाचे कारण, काही कंत्राट कामाचे होते, असे सांगितले जाते. मनावरील तोल सोडून दारावर राग काढणे, पंचायत समितीत गोंधळ घालणे, शिव्या देणे असा प्रकार पदाची गरीमा खालच्या पातळीवर आणणारा होता. एका ग्रामसेवकाचा रोष तसेच एका विभागात नियमबाह्य काम करणारा व्यक्तीचे होते. पण अधिकारी कार्यालयात नसताना मोहाडी पंचायत समिती मधील कारभार प्रभारावर सुरु आहे. अधिकारी स्वमर्जीने कारभार करू शकत नाही, असे बोलले जाते. या प्रकरणावर कर्मचाऱ्यांची बैठक झाल्याचे समजते.
एका विभागात एक अधिकारी अनेक दिवसांपासून पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे. त्या अधिकाºयांची बदली करावी अशी मागणी व तक्रार त्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या प्रकरणी कर्मचाऱ्यांची बैठक झाली. त्या पदाधिकाऱ्यांचा निषेध करायचा असे ठरले. पण काहींनी वाद नको म्हणून ही फिर्याद एका नेत्यांकडे नेली. त्या नेत्यांनी पुढे असा प्रकार करायचा नाही असे बजावले. हा वाद नेत्यांच्या बैठकीत संपविण्यात आला. असा प्रकार त्या पदाधिकाºयांनी केले तर पुढील पाऊल उचलण्यासाठी आम्ही मोकळे राहू असेही सांगून टाकले. झालेल्या प्रकाराबाबत असंतोष खदखदत आहे.

Web Title: Mohali Panchayat Samiti official's official appointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.