भ्रूणहत्येची माहिती द्या अन् बक्षीस मिळवा

By admin | Published: March 19, 2017 12:20 AM2017-03-19T00:20:04+5:302017-03-19T00:20:04+5:30

मुलींचे घटते प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना आखल्या असून स्त्रीभ्रुण हत्या करणाऱ्या डॉक्टरांचे व सोनोग्राफी केंद्राचे नाव कळविणाऱ्या ...

Get informed about fetal life and get reward | भ्रूणहत्येची माहिती द्या अन् बक्षीस मिळवा

भ्रूणहत्येची माहिती द्या अन् बक्षीस मिळवा

Next

जिल्हा प्रशासनाचे आवाहन : नावाबाबत गोपनीयता राहील
भंडारा : मुलींचे घटते प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना आखल्या असून स्त्रीभ्रुण हत्या करणाऱ्या डॉक्टरांचे व सोनोग्राफी केंद्राचे नाव कळविणाऱ्या जागरूक नागरिकास २५ हजार रुपये रोख रक्कम बक्षिस देण्याची योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. विशेष म्हणजे यासंबंधी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये २०११ च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर प्रमाण ८९४ एवढे आहे. सन २००१ च्या जनगणनेच्या तुलनेत हे प्रमाण आता १३ अंशाने कमी झाले आहे. भंडारा जिल्ह्याचे सध्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण ९५९ आहे. महाराष्ट्रातील ० ते ६ वर्ष या वयोगटातील नागरी नोंदणी जन्माच्या वेळीचे लिंग गुणोत्तर प्रमाण २०१५ मध्ये ९०७ होते. २०१६ मध्ये ते ८९९ एवढे झाले. म्हणजे ८ अंकाने घटले असून ही बाब चिंताजनक आहे. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे घडलेल्या घटनेवरुन लिंग निदान होत असल्याचे निदर्शनास येते. यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत. पीसीपीएनडीटी कायदा अस्तित्वात असतानाही गर्भलिंग निदान होत असून या घटनेची दखल घेत शासनाने १५ मार्च ते १५ एप्रिलदरम्यान सर्व रूग्णालयाची तपासणी मोहिम हाती घेतली आहे. ज्या सोनाग्राफी केंद्रावर गर्भलिंग निदान होत आहे, अशी माहिती नागरिकांना मिळाल्यास ही माहिती जिल्हा रूग्णालय, जिल्हाधिकारी यांना कळवावी. १०४ आणि या टोल फ्री क्रमांकावरही माहिती देऊ शकता. त्याप्रमाणे आपली मुलगी संकेतस्थळावर ही माहिती दिल्यास त्याची तात्काळ दखल घेण्यात येईल. गर्भलिंग निदान करणाऱ्या किंवा सोनोग्राफी केंद्राबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीस २५ हजार रूपयांचे रोख बक्षिस देण्यात येणार आहे. परंतु नागरिकांनी खात्रीशिर माहिती पुरवावी. विनाकारण सोनोग्राफी केंद्राची बदनामी होईल किंवा निष्पाप डॉक्टरला मनस्ताप होईल, अशी माहिती देऊ नये, असेही जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Get informed about fetal life and get reward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.