पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट जुलैअखेर पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:03 PM2019-06-24T22:03:18+5:302019-06-24T22:03:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेची पीक कर्ज वाटपाची प्रगती चांगली असून या बँकेप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकानीही शेतकऱ्यांना ...

Complete the target for crop sharing at the end of July | पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट जुलैअखेर पूर्ण करा

पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट जुलैअखेर पूर्ण करा

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेची पीक कर्ज वाटपाची प्रगती चांगली असून या बँकेप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकानीही शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज द्यावे. बँकानी त्यांना दिलेले उद्दिष्ट जुलैअखेर १०० टक्के पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी सोमवारी दिले. जिल्ह्यात आतापर्यंत उद्दिष्टाच्या ५१ टक्के पीक कर्ज वाटप झाले असून त्यात सर्वाधिक वाटा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आहे.
येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी खरीप पीक कर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी अग्रणी बँक व्यवस्थापक एस. एस. खांडेकर, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, नाबार्डचे महाव्यवस्थापक संजय देवगीरकर आणि बँकाचे अधिकारी उपस्थित होते.
खरीप हंगामासाठी जिल्ह्याला ४१४ कोटी ५० लाखांचे उद्दिष्ट आहे. २० जूनपर्यंत २१२ कोटी ४२ लाख कर्ज वाटप करण्यात आले. यात जिल्हा बँकेचा वाटा १८० कोटी ७३ लाख आहे. बँकानी जुलैअखेरपर्यंत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट १०० टक्के पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी दिले.
सामाजिक सुरक्षा योजनाचे सक्रिय व निष्क्रीय खाते पाहून निष्क्रीय खात्यांना सक्रिय करण्यासाठी मदत करण्याची सुचना त्यांनी दिली. प्रत्येक बँकानी दर तीन दिवसांनी पीक कर्ज वाटपाची माहिती अग्रणी बँक व्यवस्थापकांना पुरविण्याचे निर्देश दिले. या बैठकीत अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर.एस. खांडेकर यांनी प्रगतीचा आढावा सादर केला.
गावनिहाय कर्जवाटप मेळावे
शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना कोणतीही अडचण येवू नये यासाठी गावनिहाय कर्ज वाटप मेळावे घ्यावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिले. कर्ज वाटपाचा नियमित अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठविणे आवश्यक असल्याचे सांगून बँकाना मनापासून काम करण्याच्या सुचना दिल्या.
७१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत जिल्ह्यात मे अखेर ७१ हजार ६६६ सभासद शेतकऱ्यांना १९५ कोटींची कर्जमाफी देण्यात आली आहे. वंचित शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
खांडेकर यांचा सत्कार
अग्रणी बँक व्यवस्थापक आर.एस. खांडेकर ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी प्रशासन व बँक यांच्यात उत्तम समन्वय ठेवला. त्यानिमित्त त्यांचा सत्कार जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांच्याहस्ते करण्यात आला. खांडेकर यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांप्रती आत्मीयता ठेवत उत्कृष्ठ कार्य केले. बँकाना लोकाभिमूख करण्यासाठी त्यांचा सदैव प्रयत्न असतो.

Web Title: Complete the target for crop sharing at the end of July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.