संकष्ट चतुर्थीनिमित्त जाणून घेऊया सिद्धीविनायकाचा महिमा आणि स्मरण करूया अष्टविनायकाचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 08:00 AM2021-08-25T08:00:00+5:302021-08-25T08:00:12+5:30

बाप्पाचे कोणतेही मूर्त अमूर्त स्वरूप हे आनंददायीच आहे. त्याचे स्मरण करून मनापासून म्हणूया गणपती बाप्पा मोरया...!

On the occasion of Sankashta Chaturthi, let us know the glory of Siddhivinayaka and let us remember Ashtavinayaka! | संकष्ट चतुर्थीनिमित्त जाणून घेऊया सिद्धीविनायकाचा महिमा आणि स्मरण करूया अष्टविनायकाचे!

संकष्ट चतुर्थीनिमित्त जाणून घेऊया सिद्धीविनायकाचा महिमा आणि स्मरण करूया अष्टविनायकाचे!

googlenewsNext

गणपती बाप्पाचे कोणतेही रूप घ्या, ते गोडच वाटते. म्हणून तर लहान मुलांपासून कसलेल्या चित्रकारांपर्यंत सर्वांनाच त्याचे मोहक रूप चितारावेसे वाटते. गणेश देवस्थान कुठेही असो, तिथे गेल्यावर बाप्पाच्या दर्शनाने प्रसन्न वाटते. म्हणून तर त्याला मंगलमूर्ती म्हणतात. अशा या गजाननाच्या मुख्य अवतारांचे संकष्टी निमित्त स्मरण करून त्याचा मंत्र जपूया. 

अष्ट विनायक: जरी गणेशाचे अनेक अवतार झाले असले तरी आठ अवतार अधिक प्रसिद्ध आहेत, ज्यांना अष्ट विनायक म्हणतात. 

पहिला गणपती - मोरगावचा श्री मयुरेश्वर
दुसरा गणपती - सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर
तिसरा गणपती - पालीचा श्री बल्लाळेश्वर
चौथा गणपती - महाडचा श्री वरदविनायक
पाचवा गणपती - थेऊरचा श्री चिंतामणी
सहावा गणपती - लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक
सातवा गणपती - ओझरचा श्री विघ्नेश्वर
आठवा गणपती - रांजणगांवचा श्री महागणपती

सिद्धीविनायक : या अष्टविनायकांप्रमाणे सिद्धीविनायकाचे दर्शनही शुभ मानले जाते. सिद्धटेक नावाच्या पर्वतावर दिसल्यामुळे त्याला सिद्धी विनायक म्हटले जाते. सिद्धीविनायकाच्या उपासनेमुळे प्रत्येक संकट आणि अडथळ्यांपासून त्वरित सुटका मिळते. सिद्धी विनायकाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि सर्व प्रकारच्या कर्जापासून मुक्तता मिळते. याची पूजा केल्याने कुटुंबात सुख, समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते आणि संतती सुख नसलेल्यांना संतती प्राप्ती होते. असे म्हटले जाते की विश्वाच्या निर्मितीपूर्वी भगवान विष्णूंनी सिद्धटेक पर्वतावर त्यांची पूजा केली. त्यांची पूजा केल्यावरच ब्रह्मदेव कोणत्याही अडथळ्याशिवाय विश्वाची निर्मिती करू शकले. अशी सिद्धिविनायकाची ख्याती आहे. सिद्धी विनायकाचे स्वरूप चतुर्भुज असून त्यांच्या पत्नी रिद्धी सिद्धीही त्यांच्यासोबत बसल्या आहेत. सिद्धी विनायकने वरच्या हातात कमळ आणि अंकुश आणि खालच्या हातात मोत्यांची माला आणि एका हातात मोदकांनी भरलेले भांडे ठेवले आहे. 

सिद्धी विनायकाचे मंत्र:
"ॐ सिद्धिविनायक नमो नमः"
"ॐ नमो सिद्धिविनायक सर्वकार्यकत्रयी सर्वविघ्नप्रशामण्य सर्वराज्यवश्याकारण्य सर्वज्ञानसर्व स्त्रीपुरुषाकारषण्य"

अशाप्रकारे बाप्पाचे कोणतेही मूर्त अमूर्त स्वरूप हे आनंददायीच आहे. त्याचे स्मरण करून मनापासून म्हणूया गणपती बाप्पा मोरया...!

Web Title: On the occasion of Sankashta Chaturthi, let us know the glory of Siddhivinayaka and let us remember Ashtavinayaka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.