माजलगावात चोरी; पाच तोळे सोने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:23 AM2018-11-26T00:23:06+5:302018-11-26T00:23:30+5:30

पाटील गल्ली भागात राहणारे सतीश होके यांच्या घरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करीत हॉलचे कुलूप तोडून कपाटातील पाच तोळे सोन्याचे व १०० ग्राम चांदीचे दागिने लंपास केले.

Stolen in Majalgaon; Five Tola Gold Lampas | माजलगावात चोरी; पाच तोळे सोने लंपास

माजलगावात चोरी; पाच तोळे सोने लंपास

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : येथील पाटील गल्ली भागात राहणारे सतीश होके यांच्या घरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करीत हॉलचे कुलूप तोडून कपाटातील पाच तोळे सोन्याचे व १०० ग्राम चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.
होके यांच्या घरातून चोरटे बाहेर पडताना गल्लीतील लोकांनी त्याला पाहिले. मात्र इतर लोक जमा होईपर्यंत तो पसार झाला होता. त्यानंतर बाहेरील लोकांनी सतीश होके यांना आवाज देऊन उठवले असता हॉलमध्ये असलेल्या कपाटातील २० ग्राम सोन्याचे झुंबर, कानातील टॉप्स जोड ६ ग्राम, कानातील फुलजोड २ ग्राम, १२ ग्रामच्या तीन अंगठ्या, २० ग्रामचे मिनी गंठण, १०० चांदीचे चैनजोड आदी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटनेनंतर श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते.
बीडमध्ये घरफोडी, ३१ हजारांचा ऐवज लंपास
बीड : घराचे कुलूप आणि कडीकोंडा तोडून आतमध्ये शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील नगदी रक्कम व सोन्याचे दागिने असा ३१ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. चोरीची ही घटना रविवारी समोर आली. या प्रकरणी अज्ञाताविरूध्द शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
रमेश केशवराव बिडवे यांचे शहरातील शिवाजीराव धांडेनगर येथे घर आहे. रविवारी ते कुटुंबासह पुणे येथे गेले होते. रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ते घरी पोहोचले. तेव्हा घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून कपाटातील नगदी साडेदहा हजार, पाच ग्रॅमचे १५ हजार रूपये किंमतीचे सुवर्ण फुले व साडेपाच हजार रूपये किंमतीचे नवे कपडे असा ३१ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान बिडवे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Web Title: Stolen in Majalgaon; Five Tola Gold Lampas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.