महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 11:48 PM2019-03-05T23:48:06+5:302019-03-05T23:48:33+5:30

अवैध वाळू वाहतूक टिप्पर पकडल्याचा राग मनात धरून वाळू माफियांनी महसूलच्या पथकावर हल्ला चढविला. ही घटना धुळे- सोलापूर महामार्गावरील गेवराई तालुक्यातील पाडळसिंगीजवळ सोमवारी रात्री घडली.

Sand mafia attack on revenue department | महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांचा हल्ला

महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांचा हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देपाडळसिंगीजवळील घटना : गेवराई ठाण्यात ९ जणांवर गुन्हा नोंद

बीड : अवैध वाळू वाहतूक टिप्पर पकडल्याचा राग मनात धरून वाळू माफियांनी महसूलच्या पथकावर हल्ला चढविला. ही घटना धुळे- सोलापूर महामार्गावरील गेवराई तालुक्यातील पाडळसिंगीजवळ सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी ९ जणांविरोधात गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वाळू तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी महसुलचे पथक पाडळसिंगी शिवारातील टोलनाक्याजवळ दबा धरुन बसले होते. वाळू घेऊन जाणारे टिप्पर (एमएच २३ एक्यू .३०००) पथकाने रात्री ११ वाजता रोखले. वाळू चोरीची असल्याचे निदर्शनास आल्याने नायब तहसीलदार अभय जोशी यांनी टिप्पर तहसील कार्यालयात घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर पाठीमागून एका जीपमधून आलेल्या प्रवीण राऊत व इतर अनोळखी ८ जणांनी महसूल पथकातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. मंडळ अधिकारी अंगद काशीद हे यात जखमी झाले. पथकात ए. ए. कुरडकर, तलाठी व्ही. एस. ससाणे, जी. एम. ढाकणे यांचा समावेश होता. त्यानंतर वाळूमाफियाांनी टिप्परसह तेथून पळ काढला.
याप्रकरणी नायब तहसीलदार अभय जोशी यांच्या तक्रारीवरुन गेवराई ठाण्यात गौण खनिज अधिनियम व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला. तपास फौजदार अरविंद गटकुळ करत आहेत.

Web Title: Sand mafia attack on revenue department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.