ग्रामीण तरुणांची गर्दी आंदोलनस्थळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:16 AM2018-08-06T00:16:48+5:302018-08-06T00:17:44+5:30

मराठा आरक्षणासाठी तसेच मेगाभरती रद्द करावी म्हणून परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे १९ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच होते. केज, गेवराईत तिसऱ्या दिवशी ठिय्या आंदोलन सुरु होते. माजलगावात ठिय्या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी कीर्तन झाले.

Rural youth crowd movement | ग्रामीण तरुणांची गर्दी आंदोलनस्थळी

ग्रामीण तरुणांची गर्दी आंदोलनस्थळी

googlenewsNext
ठळक मुद्देपरळीत १९ वा दिवस, आष्टीत भाजप आमदाराचा ठिय्या, बीडमध्ये आज महिलांचा मोर्चा

बीड : मराठा आरक्षणासाठी तसेच मेगाभरती रद्द करावी म्हणून परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे १९ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच होते. केज, गेवराईत तिसऱ्या दिवशी ठिय्या आंदोलन सुरु होते. माजलगावात ठिय्या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी कीर्तन झाले. आष्टी येथे आ. भीमराव धोंडे यांनी मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत दोन तास ठिय्या आंदोलन केले. बीडमध्ये सोमवारी मराठा महिला क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. ७ आॅगस्टपासून पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असून, विविध ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात अतिरिक्त पोलीस बळ मागविले आहे. रविवारी शहरात पथसंचलन करण्यात आले.

केजमध्ये तिस-या दिवशीही ठिय्या
केज : येथील तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या मराठा ठिय्या आंदोलनास भेट देऊन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम मुंडे यांनी पाठींबा जाहीर केला आहे. मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता आरक्षण प्रश्नावर त्वरीत तोडगा निघणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. आपल्या मागणीसाठी कोणीही आत्महत्या करू नये असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रामभाऊ गुंड, प्राचार्य प्रवीण कन्हेरे, अंकुश इंगळे, सर्जेराव करपे, विकास मिरगणे, दीपक यादव, प्रा.हनुमंत भोसले, धनंजय देशमुख, प्रा.प्रसाद महाजन, लक्ष्मण सुरशेटवार आदी उपस्थित होते.

कीर्तनातून सांगितली आरक्षणाची गरज
माजलगाव : मराठा आरक्षणासाठी येथील तहसील समोर ठिय्या आंदोलनाचा रविवारी पाचवा दिवस होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कीर्तनातून समाज प्रबोधन करून सरकारला जागे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हभप ज्ञानेश्वर महाराज सोळंके यांनी कीर्तनातून प्रबोधन करून मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याचे पटवून दिले.

परळीत सायकल, मोटारसायकल रॅली
परळी : येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनस्थळी सहभागी आंदोलकांनी घोषणाबाजी केली. मराठा समाजातील तरूणांनी आरक्षणप्रश्नी आत्महत्या करू नये असे आवाहन राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केले. ९ आॅगस्टपासून राज्यभर होणाºया ठिय्याआंदोलनात समाजातील सर्व जण सहभागी होणार आहे, विशेष म्हणजे जनावरे, बैलगाड्याही आंदोलनात असतील असे पाटील म्हणाले.

आष्टीमध्ये भाजप आमदारांचे उपोषण
आष्टी : मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी भाजपचे आ. भीमराव धोंडे यांनी दुपारी साडेचार ते सायंकाळी सह वाजेपर्यंत तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. महाराष्ट्रात मराठा समाजासह मुस्लिम आणि धनगर समाजालाही आरक्षण मिळणे काळाची गरज असल्याचे सांगून नसून आरक्षणाबाबत सरकार अनुकूल असल्याचे आ. धोंडे म्हणाले. यावेळी माजी आ. साहेबराव दरेकर, अशोक साळवे, वाल्मिक निकाळजे, सतीश शिंदे, संतोष चव्हाण, बाबूराव केदार, अरूण निकाळजे, संजय सानप, काकासाहेब लांबरूड, सुरेश माळी, दादासाहेब झांजे, बाबासाहेब बांगर, विष्णूपंत वायभासे, राधाकिसन ठोंबरे, उद्धव शिरसाठ, जालिंदर वांढरे, दादासाहेब जगताप, प्रदीप वायभासे, पोपट गोल्हार, छगन तरटे, सीताराम पोकळे, बबनराव सांगळे आदी सहभागी होते.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त
बीड : मराठा आरक्षणासाठी सध्या जिल्हाभर आंदोलने सुरू आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यादृष्टीने जिल्ह्यात जादा कुमक मागविण्यात आली आहे. यामध्ये राज्य राखीव दल (एसआरपी), शीघ्र कृती दल (आरएएफ), दंगल नियंत्रण पथक (आरसीपी) अशा विशेष पथकांचा समावेश आहे. मागील १९ दिवसांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. अनेक ठिकाणी पोलिसांवर व दुकानांवर दगडफेक झाली. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक करून नुकसान करण्यात आले. जिल्ह्यात तीन जणांनी आरक्षणासाठी जीवन संपविले. त्यानंतर अनेक भागांत तणाव निर्माण झाला होता. अद्यापही हे आंदोलन संपलेले नाही. त्यामुळे यापुढे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विशेष बंदोबस्त बीडमध्ये पाठविण्यात आला आहे. कर्तव्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तसेच पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्र्व ठाण्यांचे पोलीस निरीक्षक हे बंदोबस्तावर असणार आहेत.

Web Title: Rural youth crowd movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.