बीडमध्ये वातावरण बदलामुळे ‘व्हायरल’ची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:57 AM2018-02-12T00:57:01+5:302018-02-12T00:57:08+5:30

डिसेंबरनंतर ओसरलेल्या थंडीमुळे वातावरण बदल होत असतानाच पुन्हा थंडीचा कडाका वाढल्याने विषाणूजन्य आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला. महिनाभरापासून अशा आजारांचे रुग्ण उपचार घेत असतानाच फेब्रुवारी उजाडल्यापासून पुन्हा वातावरणातील बदलामुळे अशा रुग्णांमध्ये भर पडत आहे. मागील काही दिवसांपासून बाल रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, न्युमोनिया, अतिसार, ब्रॉन्क्युलायटिसचे आजार असलेले रुग्णांची गर्दी झाली आहे.

 Environmental change in Beed with 'Viral' | बीडमध्ये वातावरण बदलामुळे ‘व्हायरल’ची साथ

बीडमध्ये वातावरण बदलामुळे ‘व्हायरल’ची साथ

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : डिसेंबरनंतर ओसरलेल्या थंडीमुळे वातावरण बदल होत असतानाच पुन्हा थंडीचा कडाका वाढल्याने विषाणूजन्य आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला. महिनाभरापासून अशा आजारांचे रुग्ण उपचार घेत असतानाच फेब्रुवारी उजाडल्यापासून पुन्हा वातावरणातील बदलामुळे अशा रुग्णांमध्ये भर पडत आहे. मागील काही दिवसांपासून बाल रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, न्युमोनिया, अतिसार, ब्रॉन्क्युलायटिसचे आजार असलेले रुग्णांची गर्दी झाली आहे.
काही बालकांमध्ये सर्दी, खोकला आढळून आला असून, असे आजार आपोआप मुदतपूर्ण करताच बरे होतात. मात्र, प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे आजारी व्यक्तींशी संपर्क टाळावा. आजारी व्यक्तीने थुंकू नये, बालकांना गर्दीच्या ठिकाणांपासून टाळले पाहिजे तरच हा आजार नियंत्रणात राहून गुंतागुंतीचा होणार नाही, असे सांगण्यात आले. तीव्र श्वसनदाह असलेल्या बालकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असून, श्वासाची गती वाढते, ताप येतो, चिडचिडेपणा अशी लक्षणे आढळून येतात. या आजारावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करणे महत्त्वाचे ठरते.
न्युमोनियाचेही काही रुग्ण आढळले असून, फुफ्फुसावर परिणाम करणारा गंभीर आणि गुंतागुंतीचा आजार आहे. मात्र, अशा वेळी रुग्णाला आत्मविश्वासाने हाताळले तर हा आजार नियंत्रणात येऊ शकतो. ताप आला तर घाबरायचे नाही. ओल्या कपड्याने पुसणे, तापेचे औषध देणे, वरण-भात, मूगदाळ खिचडीच्या माध्यमातून पोषण करणे, बाळाचे स्तनपान सुरु ठेवणे, स्वच्छ, शुध्द पाणी पिण्यास वापरणे महत्त्वाचे ठरते, जुलाब असणाºया रुग्णांसाठी स्वच्छ पाणी गाळलेले असावे. ओआरएसचा वापर करावा. ज्यामुळे रुग्णांना आधार होईल, असेही वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

महिनाभरापासून व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. पालकांनी न घाबरता वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार करुन घ्यावा. अँटीबायोटिकचा आग्रह न करता तापेसारखे आजार पाच दिवस गृहीत धरले पाहिजेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला कांजण्या, गोवर, गालफुगीच्या रुग्णांची वाढ होत आहे.
- डॉ. संजय जानवळे
बालरोगतज्ज्ञ

Web Title:  Environmental change in Beed with 'Viral'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.