बीड जिल्हा रूग्णालयात प्रसूतीच्या नव्हे, ‘खंडणी’ लुटीच्या ‘कळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:17 AM2018-04-02T00:17:42+5:302018-04-02T00:17:42+5:30

‘आम्ही तुमचे बाळांतपण केले’, ‘तुम्हाला सर्व मदत केली’, ‘आमच्याशिवाय तुम्हाला कोणीच नाही’, ‘तुमच्या घरात वंशाचा दिवा जन्माला आला, ५०० रूपये द्या’, ‘तुमच्या घरात महालक्ष्मी जन्माला आली, ३०० रूपये द्या’ असे म्हणत जिल्हा रूग्णालयात दायींकडून महिला रूग्णांची आर्थिक लूट केली जात असल्याची धक्कादायक माहिती शनिवारी एका तक्रारीतून समोर आली आहे. जिल्हा रूग्णालयात येणारे रूग्ण अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. अशातच लूट होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वॉर्ड क्रमांक दोन व तीनमध्ये सध्या प्रसुतीचा कमी आणि आर्थिक लुटीचा अधिक त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीमुळे जिल्हा रूग्णालयाची प्रतिमा मलीन होत चालली असून, रूग्णालयात येणाऱ्यांची संख्या रोडावत असल्याचे दिसते.

Beed not delivering in district hospital, 'ransom' robbery 'keys' | बीड जिल्हा रूग्णालयात प्रसूतीच्या नव्हे, ‘खंडणी’ लुटीच्या ‘कळा’

बीड जिल्हा रूग्णालयात प्रसूतीच्या नव्हे, ‘खंडणी’ लुटीच्या ‘कळा’

googlenewsNext

सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ‘आम्ही तुमचे बाळांतपण केले’, ‘तुम्हाला सर्व मदत केली’, ‘आमच्याशिवाय तुम्हाला कोणीच नाही’, ‘तुमच्या घरात वंशाचा दिवा जन्माला आला, ५०० रूपये द्या’, ‘तुमच्या घरात महालक्ष्मी जन्माला आली, ३०० रूपये द्या’ असे म्हणत जिल्हा रूग्णालयात दायींकडून महिला रूग्णांची आर्थिक लूट केली जात असल्याची धक्कादायक माहिती शनिवारी एका तक्रारीतून समोर आली आहे. जिल्हा रूग्णालयात येणारे रूग्ण अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. अशातच लूट होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वॉर्ड क्रमांक दोन व तीनमध्ये सध्या प्रसुतीचा कमी आणि आर्थिक लुटीचा अधिक त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीमुळे जिल्हा रूग्णालयाची प्रतिमा मलीन होत चालली असून, रूग्णालयात येणाऱ्यांची संख्या रोडावत असल्याचे दिसते.

मागील काही महिन्यांपासून जिल्हा रूग्णालयाचा कारभार बºयापैकी सुधारला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याकडून डॉक्टर, परिचारिका व दायींना वेळोवेळी सूचना करून चांगली सुविधा देण्याचे आदेश दिले जातात. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालयातही अचानक भेटी देऊन कारभार बºयापैकी सुधारला. परंतु काही त्रुटी दूर करण्यात डॉ. थोरात यांना अद्यापही यश आले नसल्याचे दिसून येते. जिल्हा रूग्णालयात आपले अधिकारी, कर्मचारी काय करतात? कोठे जातात? रूग्णांना कशी सुविधा देतात? याचा आढावा घेण्यात ते कमी पडत आहेत.

याचाच फायदा घेऊन रूग्णालयातील काही अधिकारी, कर्मचारी रूग्णांची आर्थिक लूट करण्याबरोबरच त्यांना वेळेवर आणि दर्जेदार सुविधा देण्यास कामचुकारपणा करीत असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम जिल्हा रूग्णालयाच्या प्रतिमेवर होत असून, रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांंमधून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.
रूग्णांकडून पैसे घेणाºया कर्मचाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरू लागली आहे.

नियंत्रणाचा अभाव
जिल्हा रूग्णालयात रिक्त जागा आहेत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु उपलब्ध अधिकाºयांनी तरी अशा बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ रोज सकाळी फेरफटका मारल्याने वचक राहत नाही. रूग्णांशी संवाद साधला तर ते त्यांच्या अडचणी मांडतील. परंतु असे करण्यास वरिष्ठ अधिकारी टाळाटाळ करतात. याचाच फायदा हे लुटारू कर्मचारी घेत आहेत. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्यामुळेच रूग्णांची आर्थिक लूट केली जात असल्याचे दिसून येत आहे.

वसुलीला लगाम नाही
एकीकडे जिल्हा रूग्णालयासह जिल्ह्यातील सर्वच रूग्णालयांचा कारभार सुधारण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात प्रयत्न करीत आहेत. महिला प्रसुती, दर्जेदार व वेळेवर सुविधा, डॉक्टर, कर्मचाºयांनी वेळेवर हजर राहणे, अशा अनेक कामांत सुधारणा केली. परंतु रूग्णालयातील वसुलीला मात्र त्यांना अद्याप लगाम लावता आलेला नाही.

महिन्यापूर्वीची घटना ताजी
महिन्यापूर्वीच वडवणी तालुक्यातील एक महिला प्रसुतीसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल झाली. पहाटे चार वाजेच्या सुमारास ती प्रसुत झाली. तिला वॉर्डमध्ये आणल्यानंतर येथील दायींनी तिच्यासोबत असलेल्या नातेवाईकांकडे ५०० रूपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देताच, त्यांना अरेरावी केली. सकाळी याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी तात्काळ पाऊले उचलली आणि संबंधित दायींवर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानंतर काही दिवस येथील आर्थिक लूट थांबली होती. आता पुन्हा तीच परिस्थिती सुरू झाल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे.

गर्भवती महिलांसोबत अरेरावीचे वर्तन
अगोदरच प्रसुतीच्या वेदनांनी गर्भवती महिला त्रस्त असतात. त्यात पुन्हा येथील काही कर्मचाºयांकडून त्यांना अरेरावी होते. यामुळे त्यांची मानसिकता बिघडते. प्रसुतीसाठी आलेल्या महिलेसोबत असलेल्या नातेवाईकांशीही अरेरावी होत असल्याचे समोर आले आहे.

यापूर्वी तक्रार आली होती
यापूर्वी देखील अशी तक्रार आली होती, हे खरे आहे. त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई केली होती. आता पुन्हा ही तक्रार आली आहे. हा प्रकार गंभीर आहे, हे मान्य आहे. सदरील दाईवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल. एवढेच नव्हे तर कार्यालयात सर्वत्र बोर्ड लावले जातील. रूग्णांनी कोणालाही पैसे देऊ नयेत. रूग्णालयात असे प्रकार होत असतील तर खपवून घेतले जाणार नाहीत. यामध्ये कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. थेट कारवाई केली जाईल. आता मी स्वत: या प्रकरणात लक्ष घालतो.
- डॉ. अशोक थोरात
जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

Web Title: Beed not delivering in district hospital, 'ransom' robbery 'keys'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.