जिल्ह्यात एनएचएमच्या माध्यमातून ३०० शेततळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:02 AM2018-10-08T00:02:00+5:302018-10-08T00:02:54+5:30

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गंत फळबाग लागवडीला चालना मिळावी, यासाठी शंभर टक्के अनुदान असणाऱ्या ३०० शेततळ््यांची निर्मिती केली जाणार आहे. जिल्हाभरातील शेतकºयांना या योजनेचा लाभ सोडत पद्धतीने दिला जाणार आहे.

300 farmers through NHM in the district | जिल्ह्यात एनएचएमच्या माध्यमातून ३०० शेततळी

जिल्ह्यात एनएचएमच्या माध्यमातून ३०० शेततळी

Next
ठळक मुद्देकृषी विभाग : फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी शंभर टक्के अनुदान; सोडत पद्धतीने मिळणार लाभ

प्रभात बुडूख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गंत फळबाग लागवडीला चालना मिळावी, यासाठी शंभर टक्के अनुदान असणाऱ्या ३०० शेततळ््यांची निर्मिती केली जाणार आहे. जिल्हाभरातील शेतकºयांना या योजनेचा लाभ सोडत पद्धतीने दिला जाणार आहे.
बीड जिल्ह्यात कापूस, सोयबीन, पाऊस चांगला झाला तर ऊस या नगदी पिकांची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक वेळा उत्पादनापेक्षा खर्च जास्त होतो व शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे पाणी साठवण्यासाठी शेततळे हा एक उत्तम पर्याय शेतकºयांपुढे आहे. त्यामुळेच शासनाच्या वतीने ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना राबवलेली आहे. त्यामध्ये जिल्ह्यात जवळपास ६ हजार शेततळ््यांची निर्मिती करण्यात आली आहे.
फळबाग लागवडीला चालना मिळावी व शेतकºयांना पाणी साठवण्यासाठी एक शाश्वत स्त्रोत निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत जिल्हाभरात ३०० शेततळी तयार केली जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांनी अर्ज केले होते. या अर्जांची पडताळणी व आॅनलाईन पद्धतीने सोडत करुन २९८ जणांना या योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती जिल्हा कृषी उपसंचालक सी. डी. पाटील यांनी दिली.
...
बीड जिल्ह्यातील मृदेचा कस लक्षात घेतला तर असे लक्षात येते की, विविध फळबागांची लागवड होऊ शकते. मात्र, पाण्याचा प्रश्न असल्यामुळे शेतकरी फळबाग लावण्याचे धाडस करत नाही. त्यामुळे या योजनेमधून पाण्याचा शाश्वत स्त्रोत निर्माण केला जाणार आहे. पाण्याचे प्रमाण वाढले तर पिकांचे नियोजन करता येते, तसेच पारंपारिक पिकांसोबत, फळबाग लागवड देखील करता येऊ शक ते.
- एम. एल. चपळे, जिल्हा कृषी अधीक्षक बीड

Web Title: 300 farmers through NHM in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.