नैराश्यातून बाहेर येण्यासाठी करा शॉपिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2016 07:20 AM2016-02-10T07:20:22+5:302016-02-10T12:50:22+5:30

आता तर आपण सर्वांनीच शॉपिंग करायला पाहिजे असे एक कारण समोर आले आहे.

To get out of depression shopping | नैराश्यातून बाहेर येण्यासाठी करा शॉपिंग

नैराश्यातून बाहेर येण्यासाठी करा शॉपिंग

Next
n style="line-height: 18.1818px;">शॉपिंग हा स्वत:ला आनंदीत ठेवण्याचा फार चांगला पर्याय आहे,  असे अरिझोना स्टेट विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापिका मोनिका लिस्याक यांनी सांगितले. त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे.

मुली शॉपिंगवर नाहक खर्च करतात अशी नेहमी तक्रार केली जाते. मात्र, आता तर आपण सर्वांनीच शॉपिंग करायला पाहिजे असे एक कारण समोर आले आहे. शॉपिंग केल्यामुळे आपल्या मनातील नकारात्मक विचार कमी होतात आणि आपला मूड ठिक होतो असे एका अध्ययनात दिसून आले आहे. पण खरेदी करताना एवढे लक्षात ठेवा की आपले दु:ख किंवा अपयशाची आठवण करून देणाºया वस्तू अजिबात खरेदी करू नये.

शॉपिंग हा स्वत:ला आनंदीत ठेवण्याचा फार चांगला पर्याय आहे,  असे अरिझोना स्टेट विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापिका मोनिका लिस्याक यांनी सांगितले. त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. खरेदी करून मूड ठिक करण्याला ‘रिटेल थेरपी’ म्हणतात.

आपल्याला हव्या असलेल्या आणि आपली इच्छा असलेल्या वस्तू स्वत: जवळ असणे ही भावना आपल्या मानसिक आरोग्याला चालना देते.
लिस्याक सांगतात की, नवीन वस्तू खरेदी करून आपण आपल्या नकारात्मक भावना कमी करतो.  याला ‘विदिन डोमेन कॉम्पेनसेशन’  असे म्हणतात. पण जर आपण नकारात्मक गोष्टींची आठवण करून देणाºया वस्तू विकत घेतल्या तर याचा परिणाम उलटा होऊ शकतो.

Web Title: To get out of depression shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.