लाइव न्यूज़
 • 01:15 PM

  नवी दिल्ली- ओपी रावत यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून स्वीकारला पदभार

 • 01:10 PM

  जातीपातीचं राजकारण केलं तर महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकू - उद्धव ठाकरे.

 • 01:09 PM

  कोरेगाव भीमा घटनेमागे अदृश्य हात कोणाचे आहेत सर्वांना माहित आहे. जेव्हा कधी हे हात सापडतील तेव्हा त्यांची होळी करु - उद्धव ठाकरे.

 • 01:06 PM

  श्रीनगरमध्ये रोड शो करुन तिरंगा फडकवला तर मोदींचा अभिमान वाटला असता - उद्धव ठाकरे

 • 01:06 PM

  गाईला मारणे पाप आहे त्याप्रमाणे थाप मारणेही पाप आहे. थापाबंदी करा. लोकांना भुलवून सत्ता मिळवणं पाप आहे - उद्धव ठाकरेय

 • 01:02 PM

  यापुढे प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढणार - उद्धव ठाकरे.

 • 12:14 PM

  मुंबई - 2019 च्या दोन्ही निवडणुका स्वबळावर लढू, शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत ठराव. आणखी वाचा...

 • 12:12 PM

  शिर्डीतील संगमनेरमध्ये ऊस दरासाठी मोर्चा. उसाला 2550 रूपये दर जाहीर करण्याची मागणी.

 • 11:42 AM

  शिवसेना नेतेपदी आदित्य ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब. शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अधिकृत घोषणा. मनोहर जोशी, सुधीर जोशी यांचंही नेतेपद कायम. यंदा एकनाथ शिंदेंना नेतेपद नाही.

 • 11:40 AM

  नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने पद्मावत सिनेमाविरोधातील मध्य प्रदेश, राजस्थान सरकारची याचिका फेटाळली.

 • 11:33 AM

  पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ. कुत्र्याच्या हल्ल्यात 2 नागरिक, 2 विद्यार्थी जखमी.

 • 11:31 AM

  सोलापूर - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे स्वीय सहाय्यक कल्याणराव हिप्परगे यांचं निधन. मंगळवारी सकाळी 6 वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन.

 • 10:41 AM

  साखरेचे दर 600 रूपयांनी कोसळले. हंगाम सुरू होताच दर कोसळले. एफआरपीपेक्षा जास्त दर देण्यास कारखान्यांचा नकार.

 • 10:40 AM

  ठाणे- घोडबंदर रोडवर अपघात. एकाचा मृत्यू, तीन जण जखमी.

 • 10:20 AM

  पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी होणार, येत्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता - सूत्र

All post in लाइव न्यूज़