वाहनाच्या धडकेत दोन कामगार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:53 PM2019-06-25T22:53:34+5:302019-06-25T22:53:42+5:30

भरधाव पिकअपने दुचाकीला समोरुन धडक दिल्याने दोन कामगार जखमी झाले.

 Two workers injured in vehicle crash | वाहनाच्या धडकेत दोन कामगार जखमी

वाहनाच्या धडकेत दोन कामगार जखमी

googlenewsNext

वाळूज महानगर : भरधाव पिकअपने दुचाकीला समोरुन धडक दिल्याने दोन कामगार जखमी झाले. ही घटना मंगळवारी वाळूज लगत शिवराई फाट्यावर घडली.


करीम गुलाम शेख (२८) व जावेद हसन शेख (२६, रा. दोघे ढोरेगाव) हे वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत कामाला आहेत. मंगळवारी सकाळी ९ वाजता करीम व जावेद हे ढोरेगाव येथून दुचाकीने (एमएच- २०, सीएक्स-७५९९) कामाला निघाले.

औद्योगिक क्षेत्राकडे येत असताना वाळूज लगत शिवराई फाट्यावर ९:३० वाजेच्या सुमारास वाळूजकडून नगरकडे जाणाऱ्या भरधाव पिकअपने (एमएच-२०, डीई- ०५१९) त्यांच्या दुचाकीला समोरुन जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही जखमी झाले. अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी सायंकाळपर्यंत वाळूज पोलीस ठाण्यात नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title:  Two workers injured in vehicle crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.