दु:खी राज्य पुरस्कार राजन गवस यांना जाहीर

By Admin | Published: April 6, 2016 12:05 AM2016-04-06T00:05:08+5:302016-04-06T00:37:56+5:30

जालना : येथील प्रसिध्द उर्दू शायर राय हरिश्चंद्र साहनी दु:खी राज्य काव्य पुरस्कार यंदा डॉ. राजन गवस यांना तर कवी ना. धो. महानोर राज्य साहित्य पुरस्कार डॉ. अक्षयकुमार काळे यांना जाहीर झाला.

Sad State Award to Rajan Gawas | दु:खी राज्य पुरस्कार राजन गवस यांना जाहीर

दु:खी राज्य पुरस्कार राजन गवस यांना जाहीर

googlenewsNext


जालना : येथील प्रसिध्द उर्दू शायर राय हरिश्चंद्र साहनी दु:खी राज्य काव्य पुरस्कार यंदा डॉ. राजन गवस यांना तर कवी ना. धो. महानोर राज्य साहित्य पुरस्कार डॉ. अक्षयकुमार काळे यांना जाहीर झाला. मंगळवारी कै. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट व उर्मी यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत विनित साहनी यांनी ही माहिती दिली.
कै. नंदकुमार साहनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. यंदा ७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता फुलंब्रीकर नाट्यगृहात प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वितरण सोहळा होणार असल्याचे साहनी यांनी सांगितले.
कोल्हापूर येथील डॉ. राजन गवस यांच्या समग्र साहित्यातील योगदानासाठी तर डॉ. अक्षयकुमर काळे यांना साहित्यातील समीक्षणाच्या योगदानाबद्दल या पुरस्कारांसाठी निवड झाली. कवी आणि कवितेच्या सन्मानासाठी गेल्या २० वर्षांपासून कवितेचा पाडवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दु:खी राज्य काव्य पुरस्काराचे स्वरूप २१ हजार , स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे आहे. साहित्य पुरस्काराचे ५ हजार रोख, स्मृतीचिन्ह, शाल,श्रीफळ असे स्वरूप आहे.
पत्रकार परिषदेस नवल साहनी, उर्मीचे प्रा. जयराम खेडेकर, डॉ. संजीवनी तडेगावकर उपस्थिती होते.

Web Title: Sad State Award to Rajan Gawas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.