राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या ‘स्वर’ तेजाने प्रकाशमान जाहले अवघे रसिकजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 07:25 PM2017-10-17T19:25:51+5:302017-10-17T19:26:25+5:30

तरुणांचे लाडके युवा शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि महेश काळे यांची जुगलबंदी प्रथमच आपल्या शहरात ऐकायला मिळणार म्हणून सकाळी पाच वाजेपासूनच लोकांची जागा पकडण्यासाठी ही धडपड.

Rahul Deshpande and Mahesh Kale's 'Vox' are the brightest stars! | राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या ‘स्वर’ तेजाने प्रकाशमान जाहले अवघे रसिकजन!

राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या ‘स्वर’ तेजाने प्रकाशमान जाहले अवघे रसिकजन!

googlenewsNext

औरंगाबाद : अजून उजाडलेही नव्हते की, सरस्वती महाविद्यालयाच्या परिसरात लगबग सुरू झाली होती. निमित्तही तसेच होते. तरुणांचे लाडके युवा शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि महेश काळे यांची जुगलबंदी प्रथमच आपल्या शहरात ऐकायला मिळणार म्हणून सकाळी पाच वाजेपासूनच लोकांची जागा पकडण्यासाठी ही धडपड.

अभ्युदय फाऊं डेशनतर्फे आयोजित ‘अभ्युदय पहाट’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाला मंगळवारी धनत्रयोदशीच्या पहाटे दर्दी रसिकांनी तुडुंब गर्दी केली होती. महेश आणि राहुल यांनी मंचाचा ताबा घेताच सर्वांचे कान आतुर झाले पहिले स्वर ऐकण्यासाठी. त्यांनी ‘शीतल कोमल मंद मंद चलत पवन’ या बंदिशीने मैफलीस प्रारंभ केला. त्यांच्या आरोह-अवरोह आणि आलापावर रसिकांच्या टाळ्यांची साथसंगत मिळत गेली.

मग अहिर भैरव रागातील पारंपरिक बंदिश ‘अलबेला सजन आयो रे’ गाऊन रसिकांना तृप्त केले. राहुल यांची एकल प्रस्तुती ‘तेजोनिधी लोहगोल’, ‘घेई छंद मकरंद’ आणि ‘बगळ्याची माळ फुले अंबरात’, तर महेश यांची एकल प्रस्तुती ‘आधी रचिली पंढरी’, ‘मुरलीधर घनश्याम हे नंदलाल’ आणि ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ने रसिकांची दिवाळीची सूरमयी सुरुवात केली. अखेर ‘कानडा राजा पंढरीचा’ एकत्र गाऊन त्यांनी स्वरसफरीचा शेवट केला.

त्यांना तबल्यावर निखिल फाटक, संवादिनीवर राजीव तांबे आणि पखवाजावर ओंकार दळवी यांनी उत्तम साथ दिली. कानसेनांच्या ‘वाह!’ सोबतच राहुल व महेश एकमेकांच्या गायकीला दाद देत होते. तत्पूर्वी कल्याण अपार यांनी सनईवादन केले. त्यांना महेश साळुंखे, जगदीश आचार्य, केदार जाधव, अनिल तोडकर आणि चौरे महाराज यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमाच्या आरंभी प्रतीक लाड, साक्षी चितलांगे, गणेश दुसारिया, नितीन घोरपडे आणि गिर्यारोहक मनीषा वाघमारे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंचावर सरस्वती भुवनचे दिनकर बोरीकर, दिनेश वकील, श्रीरंग देशपांडे, एमजीएमचे विश्वस्त अंकुश कदम, प्रताप बोराडे, रामकृष्ण जोशी, पं. नाथ नेरळकर, उद्योजक राम भोगले, सचिन मुळे, नंदकिशोर कागलीवाल, गणेश जहारागीरदार उपस्थित होते. महेश अंचितलवार आणि श्रीकांत देशपांडे यांनी सूत्रसंचालन, तर श्रीराम पोतदार यांनी आभार मानले.

औरंगाबादकर दर्दी रसिक
गेल्या तीन वर्षांपासून आम्ही सातत्याने औरंगाबादमध्ये दिवाळी पहाट करतोय. येथील रसिक श्रोत्यांची उपस्थिती आणि प्रतिसाद उत्साहवर्धक असतो. औरंगाबादच्या दिवाळी पहाटमध्ये आम्हाला पुण्याच्या सवई गंधर्व महोत्सवाची अनुभूती येते, असे प्रांजळ मत राहुल देशपांडे आणि महेश काळे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी रसिकांचे आभार मानताना व्यक्त केले.

Web Title: Rahul Deshpande and Mahesh Kale's 'Vox' are the brightest stars!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.