'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 04:24 PM2024-04-30T16:24:07+5:302024-04-30T16:24:40+5:30

'2014 मध्ये सुमारे 100 सिंचन प्रकल्प अनेक दशकांपासून प्रलंबित होते, त्यापैकी 26 प्रकल्प एकट्या महाराष्ट्रातील होते. काँग्रेसने महाराष्ट्राचा किती मोठा विश्वासघात केला, याची कल्पना करा.'

PM Modi in Maharashtra: '10 years ago there was a government of remote control...' PM Modi strongly criticizes Congress from Latur | '10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

PM Modi in Maharashtra: लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील मतदान झाले असून, आता तिसऱ्या मतासाठी निवडणूक प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर असून, आज त्यांनी माढा, लातूर, धारिशिव येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरादर हल्लाबोल केला. गेल्या 10 वर्षात मी माझ्या शरीराचा प्रत्येक कण आणि माझा प्रत्येक क्षण तुमच्या सेवेत वापरला, असे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणतात, देशात 10 वर्षांपूर्वी रिमोट कंट्रोलचे सरकार असताना महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते कृषीमंत्री होते. ते बलाढ्य नेते दिल्लीवर राज्य करायचे, तेव्हा उसाची एफआरपी 200 रुपयांच्या आसपास होती. आज भाजप सरकारच्या काळात उसाची एफआरपी 350 रुपयांच्या आसपास आहे. आज देशातील आणि महाराष्ट्रातील जनता मोदी सरकारची 10 वर्षे आणि काँग्रेस सरकारची 60 वर्षे, यातील फरक पाहत आहे. जे काँग्रेस 60 वर्षात करू शकले नाही, ते आम्ही 10 वर्षात करुन दाखवले. 

महाराष्ट्रातील लोक जेव्हा प्रेम आणि आशीर्वाद देतात, तेव्हा ते कोणतीही कसर सोडत नाहीत. पण जेव्हा कोणी दिलेले आश्वासन पूर्ण करत नाही, तेव्हा महाराष्ट्रातील जनता ते लक्षात ठेवते आणि वेळ आल्यावर हिशोबही करते. 15 वर्षांपूर्वी एक मोठा नेता येथे निवडणूक लढवण्यासाठी आला होता. त्यांनी मावळत्या उन्हात दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचवण्याची शपथ घेतली होती, पण त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. 

2014 मध्ये सरकार स्थापन केल्यानंतर मी माझी संपूर्ण शक्ती या सिंचन प्रकल्पांवर केंद्रित केली. काँग्रेसचे प्रलंबित असलेले 100 पैकी 63 प्रकल्प आम्ही पूर्ण केले. प्रत्येक शेतात आणि प्रत्येक घरात पाणी पोहोचवणे हे माझ्या आयुष्यातील एक मोठे ध्येय आहे. विदर्भ असो किंवा मराठवाडा...पाण्याच्या थेंबासाठी लोक वर्षानुवर्षे त्रासले होते. देशाने काँग्रेसला 60 वर्षे देशावर राज्य करण्याची संधी दिली. या 60 वर्षांत जगातील अनेक देश पूर्णपणे बदलले, पण काँग्रेसला शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवता आले नाही. 2014 मध्ये सुमारे 100 सिंचन प्रकल्प अनेक दशकांपासून प्रलंबित होते, त्यापैकी 26 प्रकल्प एकट्या महाराष्ट्रातील होते. काँग्रेसने महाराष्ट्राचा किती मोठा विश्वासघात केला, याची कल्पना करा.

काँग्रेसच्या राजवटीत रोज सकाळी वर्तमानपत्रात नवीन घोटाळा उघड व्हायचा. कोलगेट घोटाळा, कोळसा घोटाळा, चारा घोटाळा, 2-जी घोटाळा...पण आज बातम्या येतात, इथे इतके करोडो रुपये पकडले गेले... तिकडे इतके करोडो रुपये पकडले गेले, नोटांचे बंडले सापडले. काँग्रेसने आपल्या राजवटीत भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. पण, आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनला आहे. काँग्रेसच्या राजघराण्याने आपल्या मुलांसाठी कोणता वारसा सोडला? पैसा...देशातील प्रमुख ठिकाणी जमिनी...सत्ता आणि विशेषाधिकार... आणि 6 दशकात देशाला कोणता वारसा दिला? तर फक्त गरिबी...अशी टीकाही मोदींनी केली.

Web Title: PM Modi in Maharashtra: '10 years ago there was a government of remote control...' PM Modi strongly criticizes Congress from Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.