औरंगाबादच्या व्यापाऱ्यांना १५४ प्लॉट देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:00 AM2018-05-19T00:00:42+5:302018-05-19T00:02:53+5:30

मोंढा स्थलांतराचा प्रश्न मागील २० वर्षांपासून रखडला आहे. मात्र, आता जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्या टप्प्यात १५४ प्लॉट मोंढ्यातील व्यापाºयांना देण्यास पणन संचालकांनी मंजुरी दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा मोंढा स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Plot 154 Plots for Aurangabad Traders | औरंगाबादच्या व्यापाऱ्यांना १५४ प्लॉट देणार

औरंगाबादच्या व्यापाऱ्यांना १५४ प्लॉट देणार

googlenewsNext
ठळक मुद्देमोंढा स्थलांतर : पणन संचालकांनी दिली मंजुरी; २० वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मोंढा स्थलांतराचा प्रश्न मागील २० वर्षांपासून रखडला आहे. मात्र, आता जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्या टप्प्यात १५४ प्लॉट मोंढ्यातील व्यापाºयांना देण्यास पणन संचालकांनी मंजुरी दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा मोंढा स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने जागा खरेदी करून तेथे १९९७-९८ मध्ये धान्य अडत बाजारासाठी ५ सेल हॉल बांधले. त्यावेळी मोंढ्यातील अडत व्यापाºयांनी जाधववाडीत स्थलांतर केले होते, पण येथील होलसेल किराणा व्यापाºयांनी मात्र, स्थलांतर केले नव्हते. तेव्हापासून दरवर्षी दिवाळीच्या वेळी मोंढा स्थलांतराचा प्रश्न डोके वर काढत असतो. मात्र, आता पणन संचालक आनंद जोगदंडे यांनी मोंढ्यातील ११९ व्यापाºयांना बाजार समितीमध्ये १५४ प्लॉट देण्यास मान्यता दिली. यामुळे मोंढा स्थलांतरासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. जाधववाडीत १५ एकर जागा तत्सम शेतीपूरक व्यवसायासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
येथे होलसेल किराणा व्यापाºयांना पहिल्या टप्प्यात १५४ प्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येथे १५०० ते २००० स्क्वेअर फूटप्रमाणे व्यापाºयांना प्लॉट देण्यात येणार आहेत.
पणन संचालकांनी यासाठी ४६५ रुपये स्क्वेअर फूट असा भाव काढला आहे. यासंदर्भात बाजार समितीचे सचिव विजय शिरसाट यांनी सांगितले की, व्यापाºयांना प्लॉट दिल्यानंतर तेथे सिमेंटचे रस्ते, पथदिवे सर्व सुविधा पुरविण्यात येतील व त्यानंतर एक वर्षाच्या मुदतीत त्यांना दुकानाचे बांधकाम करून तेथे व्यवसाय सुरू करावा लागणार आहे. दुसºया टप्प्यातील १२० प्लॉटला मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर त्या प्लॉटचीही व्यापाºयांना विक्री करण्यात येणार आहे. व्यापाºयांनी सकारात्मक विचार करावा, असे आवाहनही शिरसाट यांनी केले.
पिसादेवी रोडवर जनरल शॉपिंग कॉम्प्लेक्स
जाधववाडी कृउबामध्ये प्रवेश करताना पिसादेवी रोडवरील जागा आहे. त्या जागेवर जनरल शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यास पणन संचालकांनी मंजुरी दिली आहे. यात १६० दुकाने असणार आहेत. दोन मजली शॉपिंग कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन जूनच्या पहिल्या पंधरवड्यात करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती सभापती राधाकिसन पठाडे यांनी दिली.
मास्टर प्लॅन मंजुरीसाठी मनपा आयुक्तांची घेणार भेट
पणन संचालकांनी जाधववाडीत मोंढ्यातील व्यापाºयांना १५४ प्लॉटला मंजुरी दिली आहे. मात्र, अजून मनपाने येथील सुधारित मास्टर प्लॅनला परवानगी दिली नाही. यासंदर्भात मनपाचे नवीन आयुक्त निपुण विनायक यांची लवकरच भेट घेऊन त्यांना या प्रश्नाची माहिती देणार आहेत. त्यांनी मास्टर प्लॅनला परवानगी दिल्यास मनपाचे उत्पन्नही वाढणार आहे. तसेच कृउबाचे सध्याचे वार्षिक उत्पन्न ४ कोटी रुपये आहे ते वाढून ८ कोटींवर जाईल.
-राधाकिसन पठाडे
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

Web Title: Plot 154 Plots for Aurangabad Traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.