औरंगाबाद जिल्हा युवक व शहर युवक काँग्रेसचे नवे पदाधिकारी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:51 AM2018-09-14T00:51:56+5:302018-09-14T00:52:08+5:30

जिल्हा युवक काँग्रेस, शहर युवक काँग्रेस व विधानसभा मतदारसंघवार युवक काँग्रेसचे नवे पदाधिकारी जाहीर करण्यात आले

 Aurangabad District youth and city Youth Congress released new office bearers | औरंगाबाद जिल्हा युवक व शहर युवक काँग्रेसचे नवे पदाधिकारी जाहीर

औरंगाबाद जिल्हा युवक व शहर युवक काँग्रेसचे नवे पदाधिकारी जाहीर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा युवक काँग्रेस, शहर युवक काँग्रेस व विधानसभा मतदारसंघवार युवक काँग्रेसचे नवे पदाधिकारी आज जाहीर करण्यात आले. गेले तीन दिवस यासाठी गांधी भवन, शहागंज येथे अंतर्गत मतदान झाले होते. आज दुपारी गांधी भवनात निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. हरियाणाहून आलेले निरीक्षक जयदीप यादव यांच्या देखरेखीखाली ही निवडणूक संपन्न झाली.
औरंगाबाद जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी अब्दुल समीर अब्दुल सत्तार हे प्रचंड मतांनी विजयी झाले. त्यांना ३ हजार २९९ मते पडली. ते औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव असून, सिल्लोड नगर परिषदेचे अध्यक्ष आहेत. भारत साठे, शेख कैस, सिंधू पवार, विशाल दांडगे हे सत्तार यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते. आता ते उपाध्यक्ष झाले. जिल्हा युवक काँग्रेसच्या महासचिवपदी विश्वास औताडे हे निवडून आले. माजी आमदार केशवराव औताडे यांचे नातू व काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांचे चिरंजीव आहेत. त्यांना ८०० मते मिळाली. तर युवराज करकोटक यांना ५८३ मते मिळाली. फुलंब्री विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी करमाडचे माजी सरपंच विठ्ठल कोरडे (७०४) मते तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब म्हस्के (१२२) तर अक्षय घाळ (९७) निवडून आले.
औरंगाबाद शहर युवक काँग्रेस
औरंगाबाद शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी मुजफ्फर खान निवडून आले. उपाध्यक्ष म्हणून नीलेश अंबेवाडीकर, उमर पठाण, अश्फाक पठाण हे निवडून आले. तर महासचिव म्हणून इंजिनिअर मोहसीन खान, अब्दुल अजीम, शफिक शेख, नदीम सौदागर, इरफान पठाण, नदीम शेख, सलमान शेख यांची निवड झाली.
विधानसभा मतदारसंघनिहाय
पदाधिकारी असे :
औरंगाबाद पूर्व : अध्यक्ष- मोहसीन खान अजीज खान, उपाध्यक्ष- माजीद पठाण, महासचिव- आमेर खान, जावीद खान, मतीन पटेल, औरंगाबाद मध्य : अध्यक्ष - गौरव जैस्वाल, उपाध्यक्ष- इरफान खान, महासचिव- शेख सलीम युसूफ, जावीद देशमुख, औरंगाबाद पश्चिम : अध्यक्ष - मुजाहीद पटेल, उपाध्यक्ष- शोएब शेख, महासचिव- सलमान नवाब पटेल.
सत्कार...
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सुभेदारी गेस्ट हाऊसवर मनपाचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. जफर खान व प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस शेख युसूफ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हमद चाऊस, इब्राहिम पठाण, नासेर खान, शेख अथर, मतीन अहमद, मोईन इनामदार आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title:  Aurangabad District youth and city Youth Congress released new office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.