रेल्वेतून पडून २५ वर्षीय युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 01:46 PM2018-10-03T13:46:38+5:302018-10-03T13:47:11+5:30

औरंगाबाद : शिवाजीनगर रेल्वेफाटकाजवळ २५ वर्षीय युवक रेल्वेतून पडून ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. अपघातामुळे फाटकावर दुतर्फा वाहतूक ...

25-year-old youth killed in a train | रेल्वेतून पडून २५ वर्षीय युवक ठार

रेल्वेतून पडून २५ वर्षीय युवक ठार

googlenewsNext

औरंगाबाद : शिवाजीनगर रेल्वेफाटकाजवळ २५ वर्षीय युवक रेल्वेतून पडून ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. अपघातामुळे फाटकावर दुतर्फा वाहतूक अर्धातास खोळंबली होती. 

जालनाकडून येणाऱ्या रेल्वेच्या दरवाजात उभ्या २५ वर्षीय युवकाचा तोल जाऊन तो खाली पडला व गंभीर जखमी झाला. बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. जवाहरनगर पोलिसांनी जखमी युवकास घाटीत उपचारार्थ दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. प्रवासी कुठला होता, याची ओळख पटलेली नसून, त्याचे नाव व त्याच्याकडील  कागदपत्र, मोबाईल नंबर शोधण्यासाठी पोलिसांच्या एका पथकाने रेल्वे डब्यात विचारपूस केली. जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

रेल्वे दरवाजातून पडण्याच्या घटना वाढल्या
रेल्वे दरवाजात थांबून मोबाईलवर बोलणाऱ्यांवर रेल्वे पोलीस कारवाई करणार असल्याचे सांगितले; परंतु अद्याप कोणावर कारवाई झालेली नाही. फोनवर बोलण्याच्या नादात रेल्वेतूून पडणाऱ्या घटना महिनाभरापासून वाढल्या आहेत. 

वाहतूक ठप्प
दुपारी अपघाताची घटना घडली त्यावेळी शिवाजीनगर रेल्वेफाटकावर दुतर्फा वाहतूक ठप्प झाली. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.  सायंकाळपर्यंत त्या मृत युवकाची ओळख पटली नव्हती, असे सहायक फौजदार बोटके यांनी सांगितले. 

Web Title: 25-year-old youth killed in a train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.