खतांची किंमत एक टक्क्याने घसरली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:02 AM2017-07-18T00:02:33+5:302017-07-18T00:02:33+5:30

एक जुलैपासून देशभरात जीएसटी करप्रणाली लागू झाल्याने रासायनिक खतांच्या किमती एक टक्याने कमी झाल्या आहेत.

The price of fertilizer dropped by one percent! | खतांची किंमत एक टक्क्याने घसरली !

खतांची किंमत एक टक्क्याने घसरली !

googlenewsNext

जीएसटीचा परिणाम : कृषी विभागाकडून सुधारित दर लागू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एक जुलैपासून देशभरात जीएसटी करप्रणाली लागू झाल्याने रासायनिक खतांच्या किमती एक टक्याने कमी झाल्या आहेत. त्यामुळे कृषी विभागाने सुधारित दर जाहीर केले आहेत. याबाबत खतविक्रेत्यांना सूचित करण्यात आले आहे. सुधारित दरपत्रक दरफलकावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.
शेतीसाठी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर होत असतो. सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने खतांची मोठ्याप्रमाणात खरेदी-विक्री होत आहे. जीएसटी करप्रणाली लागू होण्यापूर्वी राायनिक खतांवर १ टक्के उत्पादन शुल्क व ५ टक्के मूल्याधारित कर (व्हॅट) लागू केला होता. १ जुलैपासून सरसकट ५ टक्के जीएसटी (गड्स अँड सर्व्हिस टॅक्स) लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनुदानित रासायनिक खतांच्या किमतीत १ टक्क्याने घट झाली आहे. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. एक हजाराच्या खताच्या एका गोणीमागे सरासरी १० रूपये कमी आकारले जातील. खतांमध्ये १०-२६-२६ च्या ५० किलोच्या एका गोणीसाठी एक हजार ५५ ते एक हजार ७४ असे कंपनीनुसार दर असतील. १२-३२-१६ या खताची ५० किलोची गोणी १ हजार ८२ रूपयांना मिळणार आहे. १५-१५-१५ ची गोणी ८८७, १६-१६ ची गोणी ८९२, १७-१७-१७-१७ ची गोणी ९४६, २४-२४-० ची गोणी ९६६, एमओपीची बॅग कंपनीनुसार ५७५ ते ५८०, एसएसपीची गोणी ४००, डीएपीची एक गोणी कंपनीनुसार १ हजार ७६ ते १ हजार १०५ च्या दरम्यान मिळणार आहे. युरियाच्या एक गोणीचा दर ७०० रूपयांना मिळेल. जिल्ह्यातील विविध खतविक्रीच्या दुकानांमध्ये पीओएस मशिनव्दारे खतांची विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खतखरेदी करताना आधारकार्डची प्रत सोबत ठेवावी लागेल. पीओएस मशिनव्दारे खते खरेदी करताना त्याचे बिल पीओएस मशिनव्दारे मिळणार आहे. विक्रेत्यांना पीओएस मशिनव्दारेच खतविक्रीचे बंधन घालून देण्यात आहे.

खतविक्रेत्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या खतांच्या किमती दर्शनी भागात प्रदर्शित कराव्यात. खरीप हंगामात विनातक्रार व वेळच्या वेळी शेतकऱ्यांना खतपुरवठा करावा.
- उदय काथोडे,
कृषीविकास अधिकारी

Web Title: The price of fertilizer dropped by one percent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.