अनेक वर्षांपासून सुरू आहे कुंटणखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:13 PM2017-11-29T23:13:56+5:302017-11-29T23:14:35+5:30

उच्चभ्रू वस्तीत गणल्या जाणाऱ्या भूमिपुत्र कॉलनीत अनेक वर्षांपासून कुंटणखाना सुरू होता. मात्र, त्याची भनक फे्रजरपुरा पोलिसांना लागली नाही, हा निर्ढावलेपणाचा कळस आहे.

Has been started for many years | अनेक वर्षांपासून सुरू आहे कुंटणखाना

अनेक वर्षांपासून सुरू आहे कुंटणखाना

Next
ठळक मुद्देनिर्ढावलेपणाचा कळस : पोलीस अनभिज्ञ, कुणाचाच कसा नाही विरोध ?

वैभव बाबरेकर ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : उच्चभ्रू वस्तीत गणल्या जाणाऱ्या भूमिपुत्र कॉलनीत अनेक वर्षांपासून कुंटणखाना सुरू होता. मात्र, त्याची भनक फे्रजरपुरा पोलिसांना लागली नाही, हा निर्ढावलेपणाचा कळस आहे. विशेष म्हणजे, प्रतिष्ठांच्या परिसरात हा किळसवाणा प्रकार घडतो आणि त्याला कोणीच विरोध करीत नाही, हेदेखील आश्चर्य आहे.
भूमिपुत्र कॉलनीतील नाल्याच्या काठावर असणाºया एका आलीशान घरात मनीष मार्टीन राहतो. ते घर मनीषच्या ७३ वर्षीय आत्याच्या नावावर आहे. दोन हजार चौरस फुटाच्या या घरात मोठा हॉल, एक बेडरूम, किचन व छोटीशी स्टोअर रूम आहे. घर मनीषच्या आत्याच्या नावावर असले तरी मनीषच्या प्रतापांमुळे ती एक-दीड महिन्यांपूर्वी बहिणीकडे राहायला गेली. गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या मनीषला नातलगांसह कॉलनीतील नागरिकही त्रस्त झाली आहेत. मनीषच्या घरात कुंटणखाना चालतो, ही बाब जगजाहीर आहे. दिवसरात्र त्याच्या घरात ग्राहकांच्या येरझारा सुरूच असतात. ग्राहक आपआपल्या प्रेयसी किंवा वेश्याव्यवसायातील महिलांना त्या ठिकाणी आणणात आणि पाचशे रुपये देऊन विसावा घेतात. त्याच्या मोबदल्यात मनीष त्यांना सर्व सुविधा पुरवीत होता. त्याने घराच्या देखभालीसाठी एक केअरटेकरसुद्धा ठेवला आहे.
परिसरातील महिला या घरापुढून ये-जा करण्यासही कुचरत होत्या. मात्र, विरोधाची हिंमतच कोणी न दाखविल्याने मनीषचे धाडस वाढले. दोन वर्षांपूर्वी या कुंटणखान्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. मात्र, पोलिसांनी केवळ समज दिला होता. त्यामुळे त्यानंतरही मनीषचे प्रताप स ुरूच राहिले. फक्त आता ग्राहकांना मागील दाराने बोलाविण्याचे सत्र सुरू झाले. मनीष मार्टिनला आता कोतवाली पोलिसांनी बलात्कार प्रकरणात अटक केली आहे. त्याने आरोपी आॅटोचालक एहफाज अली हैदर अली (२१, रा. गौसनगर) याला काही तासाच्या रासलीलेकरिता खोली भाड्याने दिली होती.

झाडाझुडुपांमध्ये लपले घराचे अस्तित्व
मनीष मार्टिनच्या घराचा आवार हा निसर्गरम्य आहे. सभोवताल तारेचे तुटक कम्पाऊंड असून, प्रवेशद्वाराला पोलादी पत्रा आहे. सहजासहजी बाहेरून पाहिल्यास घर दृष्टीस पडत नाही. कारण ते झाडाझुडुपांनी वेढले आहे. निसर्गरम्य वातावरण असणाºया या बंगल्याचा उपयोग कुंटणखान्यासाठी होतो, ही कल्पनाही बाहेरून हा बंगला बघणाºयांना शिवत नाही.

मनीष मार्टिनच्या घरात अश्लील प्रकार चालत असल्याचे घरझडतीमध्ये आढळून आले आहे. त्याच्या घरातून गादी जप्त करण्यात आली आहे.
- दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक, कोतवाली ठाणे.

मनीषच्या घरातून गादी जप्त
अमरावती : मनीष व एहफाजची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. मंगळवारी या दोघांनाही भूमिपुत्र कॉलनीतील घटनास्थळी पोलिसांनी आणले. त्यावेळी घराच्या पुढील दाराला कुलूप लागले होते, तर मागील दार उघडे होते. कोतवालीच्या पोलीस उपनिरीक्षक सुजाता बन्सोड, डीबीचे अब्दुल कलाम, गजानन ढेवले यांनी मनीषकडून या घराविषयी माहिती जाणून घेतली. पोलिसांनी त्याच्या घरातील प्रत्येक खोली तपासली. या ठिकाणी सिंगल बेडच्या गाद्या आढळून आल्या. या गाद्यांचा लैंगिक चाळ्यासाठी उपयोग होत असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सरकारी पंच म्हणून महापालिकेचे गिरीश चव्हाण व बळीराम हिवराळे उपस्थित होते. पोलिसांना घराच्या आवारात एमएच २७ एक्स-८५२ क्रमांकाची संशयास्पद दुचाकी आढळून आली. ती मनीषच्या मित्राची असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Has been started for many years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.