मेळघाटात गुंजतेय ढोल, बासरीचे सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 01:30 AM2018-03-02T01:30:46+5:302018-03-02T01:30:46+5:30

मेळघाटच्या आदिवासी पाड्यात त्यांच्या सर्वात मोठ्या होळी सणाला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. गावशिवारावर होळी दहन झाले की, .....

Gungeetay drum in Melghat, flute tunes | मेळघाटात गुंजतेय ढोल, बासरीचे सूर

मेळघाटात गुंजतेय ढोल, बासरीचे सूर

Next
ठळक मुद्देनाच-गाणे अन् मौज : पाच दिवस फगव्याची धूम; सिड्डू आणि जिलूचा खमंग सुवास

ऑनलाईन लोकमत
परतवाडा : मेळघाटच्या आदिवासी पाड्यात त्यांच्या सर्वात मोठ्या होळी सणाला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. गावशिवारावर होळी दहन झाले की, ढोल, बासुरीच्या स्वरांनी मेळघाटचा आसमंत कोरकू गीतांनी निनादणार आहे. पाच दिवस फगव्याची धूम आणि त्यानंतर सिड्डू, मटन, यावलीच्या पंतगी गावात उठणार आहेत. वर्षभर होळी सणाची वाट पाहत मिळेल ती अंगमेहनतीची कामे करून पै-पै जमा करीत स्थलांतरित आदिवासी आपल्या गावी परतले.
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील आदिवासी कोरकूंचे आपले विश्व आहेत. त्यांच्या रीती-परंपरा आजही शहरी जांगडींना (माणसांना) त्यांच्या मोहात पाडणाºया आहेत. मेघनाथपूजा, घुंगरू बाजार, चैत्राचा नवस, होळी आणि इतर सण ते मोठ्या उत्साहात साजरे करतात. परंतु, दिवाळीपेक्षा मोठा सण होळी असल्याने त्याची वाट वर्षभर आदिवासी बघतात. आदिवासींची संस्कृती व त्यांचे विश्व मेळघाटच्या दºयाखोºयात वसलेल्या पाड्यांमध्ये असून, नागमोडी वळणाचा मेळघाटात समधुर आदिवासी गीतांचा स्वर, ढोलकीची थाप बासुरीच्या स्वरोती निनादला आहे. शनिवारपासून फागून गीत व सिड्डू-जिलूचा सुगंध दरवळणार आहे.
मेळघाटात शुक्रवारी होळी पेटविल्या जाईल. आदिवासी दोन होळी पेटवितात. लहान आणि मोठी, त्याला चोखारी (जिता) आणि गोज (बासी) होळी असे म्हटले जाते, आदिवासी कोरकू समाजात होळी पेटविण्यासाठी एकच वेळ नसून, पहाटे ७ पासून सायंकाळी ७ पर्यंत होळी पेटविली जाते. गौलखेडा बाजार परिसरात दोन बांबू आणून गावातील प्रतिष्ठितांच्या घरी ते ठेवतात, सायंकाळी वाजत गाजत दोन्ही बांबू दोन मीटर अंतरावर उभे करतात आणि दुसºया दिवशी चोखारी व गोज होळी पेटविण्याची प्रथा आहे. काटकुंभ परिसरात एक महिन्यापासून चोखार आणि बासी होळीची तयारी फाग गीत म्हणत सुरू असते. पहिल्या दिवशी चोखारी होळी साजरी होत आहे.
होळीला सिड्डू, कोंबड्यांचा नवस
मेळघाटात पूजा करण्याची प्रथा थोडी वेगळी आहे. बिहाली परिसरात होळीची पूजा करताना सिड्डू आणि कोंबड्याचा नवस फेडतात. त्यानंतर होळी पेटली की त्याला प्रदक्षिणा घालीत कोरकू गीत ढोल बासुरीच्या तालावर युवक-युवती, महिला-पुरूष नाचगाणे करतात. पहाटे होळीची राख घरी नेऊन पाण्यात टाकून आंघोळ करतात.
पाच दिवस फगव्याची धूम
होळी म्हणताच मेळघाटातील फगव्याची आढवण होते. आदिवासी युवक-युवती होळीच्या दुसºया दिवसापासून पाच दिवस फगवा मागतात. (शहरी माणूस) जांगडीसह गावातील प्रतिष्ठितांकडून रक्कम गोळा झाली की शेवटच्या दिवशी सिड्डू, चावली, पुरी अन् जिलू (बोकडाचे मटण) ची पार्टी रंगते.
आदिवासी हे रावणाचे सैनिक
शहरी भागात सामान्यत: आदिवासी रावणाचे वंशज असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात आदिवासी रावणाचे सैनिक होते. आपल्या राजाची पूजा करणे त्यांचे कर्तव्य आहे. म्हणून मेळघाटचे आदिवासी रावणाची पूजा करीत असल्याचे सेवानिवृत्त आदिवासी शिक्षक बाबू गुरुजी दारसिम्बे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Gungeetay drum in Melghat, flute tunes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.