ग्रामपंचायत देणार जन्म-मृत्यू, विवाहप्रसंगी रोपट्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 09:53 PM2018-03-20T21:53:11+5:302018-03-20T21:53:11+5:30

वर्तमानासोबतच येत्या काळात वातावरणात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी ग्रामविकास विभागाने ‘क्लायमेंट प्रूफव्हिलेज’ निर्मितीवर भर देण्याची तयारी सुरू केली आहे.

Gram panchayat will give birth and death, wedding of seedlings on wedding | ग्रामपंचायत देणार जन्म-मृत्यू, विवाहप्रसंगी रोपट्यांची भेट

ग्रामपंचायत देणार जन्म-मृत्यू, विवाहप्रसंगी रोपट्यांची भेट

Next
ठळक मुद्देनोंदी घेणार : वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना

आॅनलाईन लोकमत
अमरावती : वर्तमानासोबतच येत्या काळात वातावरणात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी ग्रामविकास विभागाने ‘क्लायमेंट प्रूफव्हिलेज’ निर्मितीवर भर देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत बालकांचा जन्म, विवाह, गुणवंत विद्यार्थी, जन्म-मृत्यू व विवाहप्रसंगी रोपटे भेट देण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. त्या रोपांच्या संगोपनाची जबाबदारी संबंधितांवर राहील.
‘वृक्षाची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ हा उपक्रम ग्रामपंचायतीमार्फत या वर्षात राबण्यिात येणार आहे. याकरिता रोपे उपलब्ध करून घेण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. यावर्षी तापमानात मोठी वाढ होणार आहे. त्यांचा परिणाम पर्जन्यमान, उष्णता व आर्द्रतेवर होणार आहे. पृथ्वीतलावरील जीवसृष्टीने त्या वातावरणात तग धरावी, यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्याचे आव्हान शासनापुढे आहे. त्या वातावरणीय बदलास पूरक ठरणाºया गावांच्या निर्मितीचा प्रयत्न शासनाला करावा लागत आहे. त्यामध्ये गावपातळीवरील लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम राबविणे, जलसंधारण, डोंगर दत्तक घेणे, नदी दत्तक घेणे, गावतळे, गावाची वनराई, योजनांचा विकास करणे, गावनिहाय सौर ऊर्जा, पवन उर्जा आधारित स्वतंत्र ग्रिड तयार करून ऊर्जा निर्भर गावांची निर्मिती केली जाणार आहे. त्यापैकी महत्वाची असलेल्या वृक्षलागवडीची जबाबदारी ग्रामपंचायतींवर देण्यात आली. त्यासाठी येत्या वर्षभरात गावात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. प्रत्येक कुटुंबाकडून रोपांची लागवड व्हावी, त्यांचे संगोपन व्हावे, यासाठी ग्रामपंचायतीकडून रोपे देण्याची तयारी सुरू आहे.
माहेरची झाडे, स्मृती वृक्षही लावणार
ग्रामपंचायतीला ठरवून दिल्याप्रमाणे गावात नव्याने जन्माला आलेल्या बालकांचे स्वागत फळझाडाच्या रूपात शुभेच्छा देऊन केले जाईल. कुटुंबीयांना बाळाप्रमाणे संवर्धन करण्याची गळ घातली जाईल. गावातील तरुणांच्या विवाहप्रसंगी शुभमंगल वृक्ष, तसेच मुलीच्या विवाहप्रसंगी माहेरची झाडे म्हणून रोपटे दिले जातील. गुणवंत विद्यार्थी, नोकरी मिळालेले, निवडणुकीत विजयी होणाºया उमेदवारांनाही आनंदवन म्हणून रोप दिले जातील. गावात निधन झालेल्या व्यक्तीच्या घरी सांत्वन भेटीदरम्यान स्मृतीरोपटे देऊन श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.
१ जुलैपासून वाटप
१ जुलै ते ३० जून या कालावधीतील सर्वच घटना, प्रसंगाची माहिती घेऊन गरजेनुसार रोपे मागवावी, त्या रोपांचे वाटप १ जुलै रोजी एकाच दिवशी केले जाईल. रोप वाटपापूर्वी गावात वृक्षदिंडी काढली जाणार असून, वाटपप्रसंगी रोपांची नोंद ग्रामपंचायत नोंदवहीत घेणार आहे.

Web Title: Gram panchayat will give birth and death, wedding of seedlings on wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.