‘गालफुगी’ आजाराचे रु ग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:12 PM2019-01-20T23:12:04+5:302019-01-20T23:12:29+5:30

‘गालगुंड’ किंवा ‘गालफुगी’ हा सर्वसाधारणपणे लहान मुलांमध्ये पॅरामिक्झोव्हायरस या विषाणुमुळे होणारा आजार आहे. तसेच मुलांमध्ये लाळ ग्रंथींना होणारा विषाणुजन्य आजार आहे. बहुधा दोन्ही गालांना येणारी दुखरी सूज हे त्याचे प्राथमिक लक्षणे आहे.

'Galfugi' illness found | ‘गालफुगी’ आजाराचे रु ग्ण आढळले

‘गालफुगी’ आजाराचे रु ग्ण आढळले

googlenewsNext
ठळक मुद्देलसीकरण महत्त्वाचे : तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या

संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘गालगुंड’ किंवा ‘गालफुगी’ हा सर्वसाधारणपणे लहान मुलांमध्ये पॅरामिक्झोव्हायरस या विषाणुमुळे होणारा आजार आहे. तसेच मुलांमध्ये लाळ ग्रंथींना होणारा विषाणुजन्य आजार आहे. बहुधा दोन्ही गालांना येणारी दुखरी सूज हे त्याचे प्राथमिक लक्षणे आहे. ग्रामीण भागामध्ये या आजाराचे काही रुग्ण आढळून आले असून यासंदर्भात योग्य काळजी घेऊन उपचार व होऊ नये, याकरिता लसीकरण करणे महत्त्वाचे असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ धीरज सवाई यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यापूर्वी काही ‘गालफुगी’चे रुग्ण जिल्ह्याील ग्रामीण भागामध्ये आढळून आले आहेत. उपचारानंतर ते बरे झाले. या आजाराला पॅरोटायटीस असेही म्हणतात. गालामधील लाळग्रंथींना पॅरोटिड ग्लँड असेही म्हणतात. त्याचे ‘मम्स’ हे नावसुध्दा आहे.
या आजाराची योग्यरीत्या वेळीत दखल न घेतल्यास गंभीर परिणामही होऊ शकतात. आजाराचा रुग्ण प्रामुख्याने पावसाळ्यानंतर आढळून येतात. या आजाराचे जुलैनंतर सिझन सुरु होते, तर हिवाळ्यातसुद्धा याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येतात. सर्दी, खोकला जर मुलांना असेल तर याचे विषाणु हवेतून इतरांच्या शरीरात जावून त्यांनाही या आजाराची लागण होण्याची शक्यता असते. हा झपाट्याने संसर्ग होणार हा आजार असून शाळेमध्ये जाणाऱ्या लहान मुुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. सूज येणे, गाल लाल होणे आदी लक्षणे या आजाराची आहेत. त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
गालफुगी आजाराची ही आहेत लक्षणे
व्हायरल इन्फेक्शनमुळे लहान मुलांमध्ये होणारा आजार आहे. यामध्ये एका बाजुने गालफुगी होते नंतर दुसºया बाजुने गालफुगी होेते. या आजारात मुलांना ताप येतो. पोटाचेसुद्धा विकारसुध्दा बळावतात. उलट्या होतात. त्वरित उपचार केला नाही, तर मेंदूवर सूज येण्याची शक्यता असते. ५ ते १२ वयगटातील मुलांमध्ये हा आजार होेत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. हा आजार शाळेत एकाला झाल्याच त्यापासून अन्य विद्यार्थ्यांनाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काय केले पाहिजे?
हा आजार घशाच्या संबंधित असल्याने, जास्त पाणी पिणे, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे, एमएचआर अंतर्गत मुलांचे गालफुगी(मम्स) या आजाराचे लसीकरण करणे, यामध्ये पहिली लस बाळ १५ महिन्याचे असताना तर दुसरी लस साडेतीन वर्षांचे झाल्यानंतर करणे अनिवार्य राहते.

ताप मेंदूत जातो. हृदयावरसुध्दा याचा परिणाम होऊ शकतो. याचा त्वरित उपचार केला नाही तर मुलांना जीवनात वंधत्वसुद्धा येऊ शकतो. त्या कारणाने या आजाराला दुर्लक्षित करु नये.
- धीरज सवाई, बालरोगतज्ज्ञ

Web Title: 'Galfugi' illness found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.