मेळघाटातील आहार बंदवर लवकरच तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 10:05 PM2017-09-15T22:05:17+5:302017-09-15T22:05:30+5:30

राज्यातील अंगणवाडी सेविका-मदतनीस यांनी सोमवारपासून त्यांच्या विविध मागण्यासाठी संप पुकारलेला आहे.

Fix the food closet in Melghat soon | मेळघाटातील आहार बंदवर लवकरच तोडगा

मेळघाटातील आहार बंदवर लवकरच तोडगा

Next
ठळक मुद्देकुपोषणात वाढ होण्याची भीती : पाचव्या दिवशीही आहार बंदच

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : राज्यातील अंगणवाडी सेविका-मदतनीस यांनी सोमवारपासून त्यांच्या विविध मागण्यासाठी संप पुकारलेला आहे. यामुळे मागील पाच दिवसांपासून जिल्हा आणि विशेषत: मेळघाटात वीस हजारांवर आदिवासी मुलांसह स्तनदा व गर्भवती मातांना दररोज दिला जाणारा आहार बंद आहे. त्यामुळे पूरक पोषणआहाराभावी बालकांच्या कुपोषणात वाढ होण्याची भीती वर्तविली जात आहे.
उर्वरित जिल्ह्यांच्या तुलनेत मेळघाटची परिस्थिती वेगळी आहे. येथे पोषण आहार वितरण बंद राहिल्यास शासनाने चालविलेल्या कुपोषणमुक्तीच्या प्रयत्नांमध्ये अडसर निर्माण होऊन येथील कुपोषित बालके कुपोषणाच्या तिसºया व चौथ्या श्रेणीत जाऊन झपाटयाने कुपोषणात वाढ होणार आहे. मेळघाटचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी राज्यशासनासह जिल्हा प्रशासनाला विशेष दखल घेण्याची गरज आहे
अत्यावश्यक सेवेसाठी तडजोड सुरू
अंगणवाडीतील सेवा या माता आणि बालकांच्या आहार आणि आरोग्याशी संबंधित असल्यामुळे अत्यावश्यक सेवेत मोडतात. म्हणून या सेवा पुरविणे सेविका आणि मदतनीस यांच्यावर बंधनकारक आहे. राज्य पातळीवर याबाबत सकारात्मक पावले उचलली जात असून याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे. तर जिल्हा पातळीवरील संघटनेच्या नेत्यांशी देखील चर्चा करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण अधिकारी कैलास घोडके यानी सांगितले. मेळघाटमधील अंगणवाडी सेविका व मदतनीसांसोबत सुद्धा चर्चा सुरू असून येथील बºयाच सेविका आणि मदतनीस ही बाब आहार आणि आरोग्याशी संबंधित अत्यावश्यक बाब असल्याने सेवा देण्यास तयार असल्याची माहिती आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविकांच्या सतत संपर्कात आहेत. येत्या एक-दोन दिवसांत जिल्हयातील हा प्रश्न मिटला नाही तरी मेळघाटात पूर्ववत आहार वितरण सुरू केले जाईल

मेळघाटात दोन हजार कुपोषित बालके
अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.त्याचा सर्वाधिक फटका मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील कुपोषित बालकांसह गर्भवती माता व स्तनदा मातांना बसला आहे. धारणी व चिखलदरा तालुक्यातील दोन हजार बालके कुपोषित असून सहा हजार मध्यम श्रेणीत तर वीस हजारांवर बालके मध्यम श्रेणीत आहेत. सहा हजार गर्भवती व स्तनदा मातांचा आहार सुद्धा मागील पाच दिवसांपासून बंद आहे.

पोषण आहाराबाबत मेळघाटचा प्रश्न गंभीर आहे सेविका आणि मदतनिस संघटनेसोबत बोलणी सुरू आहेत. लवकरच पुन्हा पोषण आहार सुरू करण्याचे प्रयत्न सुरु आहेत
- कैलास घोडके
उपमुख्यकार्यपालन अधिकारी, मबाक अमरावती

Web Title: Fix the food closet in Melghat soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.