जिल्हा बँकेतील ३१ हजार खातेदारांच्या अर्जात त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 09:57 PM2018-02-05T21:57:09+5:302018-02-05T21:57:37+5:30

Error in application of 31 thousand account holders in District Bank | जिल्हा बँकेतील ३१ हजार खातेदारांच्या अर्जात त्रुटी

जिल्हा बँकेतील ३१ हजार खातेदारांच्या अर्जात त्रुटी

Next
ठळक मुद्देकर्जमाफीची प्रक्रिया : जिल्ह्यात ७२,३३९ अर्ज येलो लिस्टमध्ये

आॅनलाईन लोकमत
अमरावती : ज्या शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही अशा ७२,३३९ तात्पुरत्या अपात्र शेतकऱ्यांची यादी महाआॅनलाईनद्वारा मिसमॅच डाटा लिस्टच्या स्वरूपात बँकांना प्राप्त झाली आहे. यात सर्वाधिक ३१ हजार १७७ खातेदार जिल्हा बँकेचे, तर १३ हजार ८२६ खातेदार एसबीआयचे आहेत. संबंधित बँकेशी संपर्क करून त्रुटीची पूर्तता केल्यास खातेदारांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कल्याण योजनेंतर्गत दीड लाखांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्याची कर्जमाफी केली आहे. यासाठी जिल्ह्यातील एक लाख ९७ हजार ७९३ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज पोर्टलवर भरलेत. यातील तात्पूरत्या अपात्र ७२,३३९ शेतकऱ्यांची येलो लिस्ट पुन्हा संबंधित बँकांना पाठविण्यात आली. या सर्व याद्या संबंधित बँकांच्या शाखांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेकडून, सेवा सहकारी संस्थेकडून कर्ज घेतले आहे. त्या बँकेशी किंवा गटसचिवाशी संपर्क करून आवश्यक त्या माहितीची पूर्तता सात दिवसांच्या आत केल्यास अशा शेतकऱ्यांची माहिती पुन्हा पाठविणे बँकांना सोईचे होऊन शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेता येईल. यामध्ये मोर्शी तालुक्यात ८,०४२, अंजनगाव सुर्जी ४,५९९, तिवसा ३,१४७, दर्यापूर ४,९४१, धामणगाव रेल्वे ५,८४२, चांदूर बाजार ४,९३०, भातकुली ४,०२१, अमरावती ७,६९८, चांदूर रेल्वे ३,८६७, अचलपूर ६,४२७, चिखलदरा ८६९, धारणी ४,२७६, वरूड ८,८९६ व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ४,७८४ अर्जात त्रुटी आहे. आतापर्यंत ९६ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५०९ कोटींची कर्जमाफी वर्ग केलेली आहे. येलो लिस्टमधील काही शेतकऱ्यांची माहिती बँकांकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांची माहिती अपलोड झालेली नसल्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांना पुन्हा शासनाने एक संधी दिली आहे.
त्रुटी असणारे बँकनिहाय खातेदार
येलो लिस्ट बँकांना प्राप्त झाली, यामध्ये जिल्हा बँकेचे सर्वाधिक ३१,१७७ खातेदार, एसबीआय १३,८२६, बँक आॅफ महाराष्ट्र १२,३५९, आंध्रा बँक ५१, बँक आॅफ बडोदा ४१०, बँक आॅफ इंडिया ७६२, कॅनरा २०९, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ३४४, देणा बँक १,१७३, आयडीबीआय २४४, इंडियन बँक २१५, इंडियन ओव्हरशिज बँक १७५, पंजाब नॅशनल २४२, ओरिएंटल बँक १, युको बँक ६३, युनियन बँक १,५९३, विजया बॅक ८,एक्सिस बँक २४, एचडीएफसी बँक ४५१, आयसीआयसीआय २१६, रत्नाकर बँक २६ व विदर्भ ग्रामीण बँकेचे २९४ खातेदार आहेत.

Web Title: Error in application of 31 thousand account holders in District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.