वैराट परिसरात पेटला वनवणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:48 PM2018-05-28T23:48:16+5:302018-05-28T23:48:26+5:30

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वैराट परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दृश्य सोमवारी रात्री ९ वाजता पर्यटकांना तसेच स्थानिक नागरिकांना दिसून आले. यावर्षी मेळघाटच्या अतिसंरक्षित समजल्या जाणाऱ्या व्याघ्र आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या वनविभागाच्या जंगलात प्रचंड आग लागल्याने शेकडो वृक्षांची राखरांगोळी झाली आहे.

Drying in the Viraat area | वैराट परिसरात पेटला वनवणवा

वैराट परिसरात पेटला वनवणवा

Next
ठळक मुद्देमेळघाटचे जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी : शेकडो झाडांची जळून राखरांगोळी

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वैराट परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दृश्य सोमवारी रात्री ९ वाजता पर्यटकांना तसेच स्थानिक नागरिकांना दिसून आले. यावर्षी मेळघाटच्या अतिसंरक्षित समजल्या जाणाऱ्या व्याघ्र आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या वनविभागाच्या जंगलात प्रचंड आग लागल्याने शेकडो वृक्षांची राखरांगोळी झाली आहे.
गुगामल वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या वैराट शहरीकरण पॉइंटच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगलाला आग लागल्याचे दृश्य सोमवारी रात्री होते. यासंदर्भात चिखलदऱ्यातील व्याघ्र प्रकल्प वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मण आवारे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. वनवणवा विझविण्यासाठी प्रत्येक गावात वन व्यवस्थापन समित्या असल्या तरी यंदा आगी विझविण्यात पूर्णत: निष्क्रिय झाल्याचे दुर्दैवी चित्र आहे. दरवर्षी या समित्यांना लाखो रुपयांचा निधी दिला जातो. आगीच्या ज्वाळा चिखलदरा येथील मोझरी पॉइंंट, राम मंदिर आदी परिसरातून दिसत होत्या.

Web Title: Drying in the Viraat area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.