अंधांना दिशा देईल आता डिजिटल पांढरी काठी - मुनशेट्टीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:18 AM2018-01-02T01:18:13+5:302018-01-02T01:18:23+5:30

अकोला : मार्गक्रमण करताना  खाचखडग्याचा अचूक शोध घेण्यासाठी आता  डिजिटल पांढरी काठी अंधांना दिशा देणार आहे. अद्ययावत असलेल्या या डिजिटल काठीचा आणि आधुनिक सहा थेंबाच्या ब्रेल लिपिचा वापर  करून, अंध महिला आणि युवतींनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन नॅब युनिट  महाराष्ट्रचे मुक्तेश्‍वर मुनशेट्टीवार यांनी केले.

Will give direction to the blind now Digital white rod - Munshetti | अंधांना दिशा देईल आता डिजिटल पांढरी काठी - मुनशेट्टीवार

अंधांना दिशा देईल आता डिजिटल पांढरी काठी - मुनशेट्टीवार

Next
ठळक मुद्देशंभर अंध महिला व युवतींनी घेतले ब्रेल लिपीचे प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मार्गक्रमण करताना  खाचखडग्याचा अचूक शोध घेण्यासाठी आता  डिजिटल पांढरी काठी अंधांना दिशा देणार आहे. अद्ययावत असलेल्या या डिजिटल काठीचा आणि आधुनिक सहा थेंबाच्या ब्रेल लिपिचा वापर  करून, अंध महिला आणि युवतींनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन नॅब युनिट  महाराष्ट्रचे मुक्तेश्‍वर मुनशेट्टीवार यांनी केले. अकोल्यातील शिवाजी महाविद्यालयात झालेल्या प्रशिक्षण शिबिरात ते बोलत  होते. कोइंबतूर येथील यूडीआयएस फोरम, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र, अकोला जिल्हा शाखा, अनहद अपंग कल्याण संस्था आणि शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २८ डिसेंबरदरम्यान अकोल्यात अंध महिला व युवतींना मोबीलिटी आणि ब्रेल लिपीचे प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार प्रकाश पोहरे, उद्घाटक म्हणून सूर्यभान साळुंके, नॅब युनिट महाराष्ट्रचे मुक्तेश्‍वर मुनशेट्टीवार, डॉ. अविनाश पाटील, राम  शेगोकार, प्रा. श्रीनिवासन, प्रा. विशाल कोरडे, प्रा. गजानन मानकर, प्रा. अरविंद देव, प्रा. चेतन टेटू, प्रा. उमा राठी यांनी मोबीलिटी आणि ब्रेल लिपी संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून शंभर अंध युवती आणि महिलांनी हजेरी लावली. कार्यक्रमाला प्रा. हर्षवर्धन मानकर, अंजली मेतकर, काजल रेलू सिंधानी, सुमन कोल्हे, संजय देशमुख, नयना शेंगोकार यांनी आणि  राखी जीवतानी, गौतमी  चव्हाण, पूर्वा घुमाळे, पूनम वाशीमकर, लक्ष्मी वाघ, लीना बोंळे, प्राज्वाला नागले, माधुरी देठे, सत्यशीला कांबळे, या शिबिरार्थींनी मनोगत व्यक्त  केले. कार्यक्रमाचा समारोप सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला.
 येथे नितीन खंडारे, तुलसीदास  तिवारी, प्रसन्ना टापी, युक्ता  साठे, मोनाली  देव, वैभवी गवई, लक्ष्मी वाघ, ज्योत्स्ना पवार यांनी कला सादर केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. विशाल कोरडे, भूषण मोडक, विशाल भोजने यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अकोला नॅब शाखेचे विजय सारभूकन, डॉ. नितीन उपाध्ये, वैशाली ओंनकर, महादेव मेंहगे, प्रा. विनोद देशमुख, प्रा. विनोद शेगोकार, अतुल थोरात, विनोद जाधव, अखिलेश यादव, स्वप्निल गायकवाड, रागिणी खोडवे, विजय कोरडे, गौरी शेगोकार यांनी परिश्रम घेतलेत.

Web Title: Will give direction to the blind now Digital white rod - Munshetti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.