अकोला परिमंडळातील अडीच लाख थकबाकीदारांपैकी केवळ ६ हजार शेतकऱ्यांनी  घेतला कृषी संजीवनीचा लाभ

By atul.jaiswal | Published: November 20, 2017 05:47 PM2017-11-20T17:47:03+5:302017-11-20T17:51:28+5:30

 अकोला : राज्यातील कृषीपंप वीज ग्राहकांकडील वीजबिलाची थकबाकी वसूल व्हावी, या दृष्टीने कृषीपंप वीज ग्राहकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू करून शेतकºयांना मोठा दिलासा दिला असला, तरी अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  या योजनेबाबत उदासिनता दाखविली आहे.

Only 6 thousand farmers of Akola Zone took benefits of Krushi Sanjivani scheme | अकोला परिमंडळातील अडीच लाख थकबाकीदारांपैकी केवळ ६ हजार शेतकऱ्यांनी  घेतला कृषी संजीवनीचा लाभ

अकोला परिमंडळातील अडीच लाख थकबाकीदारांपैकी केवळ ६ हजार शेतकऱ्यांनी  घेतला कृषी संजीवनीचा लाभ

Next
ठळक मुद्दे तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भरले १ कोटी १९ लाखमुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याने यामध्ये आणखी शेतकरी सहभागी होण्याची अपेक्षा चालू देयक भरून या योजनेत सहभाग नोंदविला


- अतुल जयस्वाल

 अकोला : राज्यातील कृषीपंप वीज ग्राहकांकडील वीजबिलाची थकबाकी वसूल व्हावी, या दृष्टीने कृषीपंप वीज ग्राहकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू करून शेतकºयांना मोठा दिलासा दिला असला, तरी अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  या योजनेबाबत उदासिनता दाखविली आहे. या तीन जिल्ह्यातील एकून २ लाख ५३ हजार ६१९ थकबाकीदारांपैकी फक्त ५,८५८ कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी  १७ नोव्हेंबरपर्यंत १ कोटी १९ लाख ९३७ रुपये चालू देयकापोटी भरून या योजनेत सहभाग नोंदविला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रारंभी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती, आता ही मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याने यामध्ये आणखी शेतकरी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
अकोला परिमंडळात अकोलाा जिल्ह्यासह वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यांचा समावेश आहे. अकोला परिमंडळामध्ये मार्च २०१७ अखेर एकूण २ लाख ५३ हजार १९ कृषीपंपधारक वीज ग्राहकांकडे ६६४. ७२ कोटी रुपयांची मुळ थकबाकी आहे. यामध्ये व्याज ६३२.१७ कोटी व दंड ८.८४ कोटी मिळून एकून १,३०५.७६ कोटी रुपयांची थकबाकी कृषीपंपधारक शेतकºयांकडे आहे. शेतकºयांकडील थकबाकी वसुल करण्यासाठी राज्यशासनाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना लागू केल्यानंतर १७ नोव्हेंबरपर्यंत अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  ५,८५८ थकबाकीदार कृषीपंपधारकांनी या योजनेत चालू देयक भरून सहभाग नोंदविला. याशेतकऱ्यांनी  एकून १ कोटी १९ लाख ९३७ रुपयांचा भरणा महावितरणकडे केला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील १,०१८ शेतकऱ्यांनी  १९ लाख ५६ हजार २७ रुपये, वाशिम जिल्ह्यातील १,१०२ शेतकऱ्यांनी  २६ लाख ६९२ रुपये, तर बुलडाणा जिल्ह्यातील ३,७३८ शेतकऱ्यांनी  ७३ लाख ४४ हजार २१८ रुपये बील भरून या योजनेचा लाभ घेतला आहे.

कृषी संजीवनी योजनेचे स्वरुप
कृषीपंप ग्राहकांची मूळ थकबाकी रुपये ३० हजारांपेक्षा जास्त असल्यास ती १० समान हप्त्यांमध्ये प्रत्येक दीड महिन्यांच्या कालावधीमध्ये भरणा करावी लागेल. ३० हजारांच्या आत थकबाकी असणाºयांना थकबाकी जमा करण्यासाठी ५ हप्ते देण्यात येणार आहेत. योजनेत सहभागी होण्यासाठी चालू वीजबिल भरून डिसेंबरपासून मूळ थकबाकीपैकी २० टक्के पहिला हप्ता भरावा लागेल. त्यानंतर मार्च, जून, सप्टेंबर व डिसेंबर २०१८ पर्र्यंत प्रत्येकी २० टक्क्यांस पूर्ण थकबाकी महावितरणकडे भरावी लागणार आहे.

Web Title: Only 6 thousand farmers of Akola Zone took benefits of Krushi Sanjivani scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.