शेतमाल खरेदीच्या परवान्याला ‘ऑनलाइन’ची जोड

By Admin | Published: November 16, 2016 02:24 AM2016-11-16T02:24:19+5:302016-11-16T02:24:19+5:30

घरबसल्यादेखील ऑनलाइनद्वारे प्रस्ताव सादर करता येणार आहे.

Online pair of commodity purchasing license | शेतमाल खरेदीच्या परवान्याला ‘ऑनलाइन’ची जोड

शेतमाल खरेदीच्या परवान्याला ‘ऑनलाइन’ची जोड

googlenewsNext

संतोष वानखडे
वाशिम, दि. १५- शेतकर्‍यांकडून थेट शेतमाल खरेदी करण्यासाठी खासगी बाजाराचा परवाना मिळविण्याच्या प्रक्रियेला आता ह्यऑनलाइनह्णची जोड देण्यात आली आहे. इंटरनेट कॅफे किंवा घरबसल्यादेखील ऑनलाइनद्वारे प्रस्ताव सादर करता येणार आहे.
शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे अधिकांश व्यवहार हे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत केले जातात. तथापि, शेतमाल खरेदी करण्यासाठी खासगी बाजार अथवा व्यक्तिश: व्यापार्‍यांना शासनाच्या पणन संचालनालयातर्फे परवाना दिला जातो. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर यापूर्वी व्यक्तिश: प्रस्ताव सादर करणे बंधनकारक होते. आता यामध्ये सुधारणा केली असून, १५ नोव्हेंबरपासून ऑनलाइनद्वारे प्रस्ताव सादर करता येणार आहे. थेट पणन, खासगी बाजार व व्यक्तिश: परवाना मिळविण्यासाठी संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. या संकेतस्थळावर 'डिरेक्टोरेट ऑफ मार्केटिंग' या पर्यायांतर्गत थेट पणन, खासगी बाजार, सिंगल लायसन यापैकी आवश्यक त्या लिंकवर जाऊन ह्यक्लिकह्ण करावी लागणार आहे. येथे आवश्यक ती माहिती अपलोड करून ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. परवाना मिळविण्यासाठी आता नव्याने ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाल्याने संबंधित व्यापारी अथवा खासगी बाजार संचालकांचा गोंधळ उडू नये म्हणून पणन संचालनालयाने ह्यमार्गदर्शन कक्षह्ण सुरू करण्याच्या सूचना सर्व जिल्हा उपनिबंधकांना दिलेल्या आहेत. त्यानुसार वाशिम येथे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक व विभाग प्रमुखांचा मोबाइल क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. या कार्यालयात व्यक्तिश: अथवा मोबाइल क्रमांकावरही शंकांचे निरसन केले जाणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.

Web Title: Online pair of commodity purchasing license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.