शेतकऱ्यांना देणार ‘स्मार्ट उद्योजक’तेचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 01:44 PM2018-12-03T13:44:48+5:302018-12-03T13:45:45+5:30

अकोला : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनामार्फत ‘रोजगारक्षम शेती व्यवसाय’ अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.

 Lessons for 'Smart Entrepreneurs' to Farmers! | शेतकऱ्यांना देणार ‘स्मार्ट उद्योजक’तेचे धडे!

शेतकऱ्यांना देणार ‘स्मार्ट उद्योजक’तेचे धडे!

Next

- संतोष येलकर
अकोला : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनामार्फत ‘रोजगारक्षम शेती व्यवसाय’ अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील शेतकºयांना ‘स्मार्ट उद्योजक’तेचे धडे देण्यात येणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदलती परिस्थिती आणि नैसर्गिक प्रकोपाला शेतकºयांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतीला पूरक उद्योगाची जोड दिल्यास शेती फायदेशीर ठरते. ही बाब विचारात घेता, कमी खर्चात आणि कमी व्यवस्थापन कौशल्य वापरून करता येणारे शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतकºयांमध्ये जागृती करण्यासंदर्भात नियोजन करण्याचे केंद्र आणि राज्य शासनाने संबंधित यंत्रणांना निर्देशित केले आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘रोजगारक्षम शेती व्यवसाय’ अंतर्गत शेतकरी ‘स्मार्ट उद्योजक’ हा उपक्रम राबविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत शेतीपूरक रोजगारक्षम व्यवसायाद्वारे ‘स्मार्ट उद्योजक’तेचे धडे जिल्ह्यातील शेतकºयांना दिले जाणार आहेत.

जिल्हाधिकाºयांनी काढले परिपत्रक; शेतकºयांची घेणार साप्ताहिक कार्यशाळा!
जिल्ह्यात रोजगारक्षम शेती व्यवसाय अंतर्गत शेतकरी ‘स्मार्ट उद्योजक’ हा अभिनव उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे परिपत्रक जिल्हाधिकाºयांनी २९ नोव्हेंबर रोजी काढले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्ह्यातील शेतकºयांसाठी साप्ताहिक मुक्त कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

शेतीपूरक ‘या’ व्यवसायाची शेतकºयांना दिली जाणार माहिती!
शेतकरी स्मार्ट उद्योजक या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांनी शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी साप्ताहिक कार्यशाळांमध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन, मेंढीपालन तसेच केळी, डाळिंब, मिरची, भेंडी, टरबूज, खरबूज यासह इतर फळ-भाजीपाला पिकांची निर्यात आणि इतर शेतीपूरक व्यवसायांची माहिती शेतकºयांना दिली जाणार आहे.

नोडल अधिकारीपदी अमानकर यांची नियुक्ती!
रोजगारक्षम शेती व्यवसाय अंतर्गत शेतकरी ‘स्मार्ट उद्योजक’ हा उपक्रम हाताळण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (रोहयो) अशोक अमानकर यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेशही जिल्हाधिकाºयांनी परिपत्रकात दिला आहे.
 

शेतकºयांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्ह्यात शेतीपूरक जोडधंदे सुरू व्हावे, रोजगारक्षम शेती व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी उद्योजक व्हावा, यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांना ‘स्मार्ट उद्योजक’तेचे धडे देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
-आस्तिककुमार पाण्डेय,
जिल्हाधिकारी.

 

Web Title:  Lessons for 'Smart Entrepreneurs' to Farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.