शहीद सुमेध गवर्ईंना अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 02:01 AM2017-08-15T02:01:19+5:302017-08-15T02:04:33+5:30

अकोला - श्रीनगरमधील अनंतनागनजीक असलेल्या शोपिया जिल्हय़ात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या सुमेध वामनराव गवई यांच्यावर लोणाग्रा येथे सोमवारी दुपारी २ वाजता शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारत मातेच्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्हय़ातील गावागावांतून मोठा जनसमुदाय उसळला होता. हजारोंच्या साश्रुनयनांनी ‘सुमेध गवई अमर रहे’च्या जयघोषात अखेरचा निरोप देण्यात आला.

The last message to Shahid Sumedh Garhwaar | शहीद सुमेध गवर्ईंना अखेरचा निरोप

शहीद सुमेध गवर्ईंना अखेरचा निरोप

Next
ठळक मुद्देशासकीय इतमामात अंत्यसंस्कार, अलोट जनसमुदाय गहीवरला!लोणाग्रा येथे सोमवारी दुपारी २ वाजता शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कारअखेरचा निरोप देण्यासाठी जिल्हय़ातील गावागावांतून उसळला मोठा जनसमुदाय

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला - श्रीनगरमधील अनंतनागनजीक असलेल्या शोपिया जिल्हय़ात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या सुमेध वामनराव गवई यांच्यावर लोणाग्रा येथे सोमवारी दुपारी २ वाजता शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारत मातेच्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्हय़ातील गावागावांतून मोठा जनसमुदाय उसळला होता. हजारोंच्या साश्रुनयनांनी ‘सुमेध गवई अमर रहे’च्या जयघोषात अखेरचा निरोप देण्यात आला.
शोपिया जिल्हय़ात शुक्रवारी सायंकाळी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत तीन गोळय़ा लागल्याने अकोला जिल्हय़ातील लोणाग्रा येथील रहिवासी वीरपुत्र सुमेध वामनराव गवई (२६) यांना वीरमरण आले होते. त्यानंतर दिल्ली येथील लष्कराच्या छावणीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव विमानाने नागपूर येथे व नंतर सोमवारी सकाळी लोणाग्रा येथे लष्करी वाहनाने त्यांचे पार्थिक आणण्यात आले. तत्पूर्वी अशोक वाटिका येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काही काळ ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी १२ वाजता सुमेध गवई यांचे पार्थिव राहत्या घरी आणण्यात आले. तसेच गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिक व प्रशासनातील अधिकार्‍यांनी पुष्पचक्र अर्पण करून  शहीद जवान सुमेध गवई यांना श्रद्धांजली वाहिली. दुपारी २ वाजताच्या सुमारास शोकाकुल वातावरणात रमेश चांडक यांच्या शेतात शासकीय इतमामात शहीद जवानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान सुमेध गवई यांना त्यांचे वडील वामनराव शंकरराव गवई, आई मायावती, बहीण प्रीती, भाऊ शुभम 

सैन्य दलातर्फे मानवंदना
सैन्य दलातर्फे हवेत तीन फैरी झाडून वीरपुत्र सुमेध गवई यांना मानवंदना देण्यात आली. यासोबतच पोलीस दलानेही मानवंदना दिली. त्यानंतर सामुदायिक त्रीशरण-पंचशील ग्रहण केल्यानंतर लष्क रात असलेले त्यांचे बंधू शुभम वामनराव गवई यांनी शहीद जवान सुमेध गवई यांना मुखाग्नी दिला. 

Web Title: The last message to Shahid Sumedh Garhwaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.