जातीभेद दूर ठेवा - शुकदास महाराज

By Admin | Published: January 14, 2015 12:31 AM2015-01-14T00:31:10+5:302015-01-14T00:31:10+5:30

हिवरा आश्रम येथील स्वामी विवेकानंद जयंती महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात शुकदास महाराज यांचे अवाहन.

Keep away casteism - Shukdas Maharaj | जातीभेद दूर ठेवा - शुकदास महाराज

जातीभेद दूर ठेवा - शुकदास महाराज

googlenewsNext

हिवराआश्रम (): भारत ही आपली माता आहे. आपले पालन पोषण करणारी, आपल्याला जन्म व अस्तित्व देणार्‍या एकाच मातेच्या पोटी जन्माला येणार्‍या पुत्रांचे आपसात बंधुत्वाचे नाते असते. आपण कोण त्याही जातीचे, धर्माचे, पंथाचे असलो तरी नात्याने बांधव लागतो. म्हणून सर्वांंनी मतभेद, पंथभेद, जा तीभेद बाजूला ठेवून बंधुत्वाचे नाते जोपासावे असे विचार विवेकानंद आश्रमाचे संस्थापक शुकदास महाराज यांनी व्यक्त केले.
स्थानिक विवेकानंद आश्रमात १२ जानेवारी रोजी विवेकानंद जयंती महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमा प्रसंगी आपल्या आशिर्वचनातून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांची उपस्थि ती होती. पुढे बोलतांना शुकदास महाराज म्हणाले की, विवेकानंद विचारांचे आश्रम ही एकमेव धार्मिक संस्था अशी आहे जेथे विवेकानंदांच्या जयजयकारासोबत भारत माता की जय हा जयघोष केल्या जातो. प्रत्येकाला त्याच्या आवडी निवडीनुसार धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य हवे. स्वामी विवेकानंद म्हणत प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र धर्म असला तरी चालेल कारण प्रत्येकाचा स्वभाव, प्रकृती, चिंतन एकसारखे नाही. धर्म त्याच्या उपासनेचा मार्ग ठरवील. परंतु या सर्वांंचा मिळून एक विश्‍वधर्म असावा, असे ते म्हणाले.
संस्थेच्या ५0 वर्षाच्या कालखंडात जनसेवेसाठीच जगत आलो छोट्याशा कौलारु खोलीत सुरु झालेला आश्रम आज समाजाच्या भल्यासाठी, कल्याणासाठी सोयी-सुविधा पुरवित आहे. येत्या वर्षात संस्था मुलींसाठी भव्य वसतीगृह बांधत असून, तुम्ही लेक वाचवा, मी तिला शिक्षण देईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. संस्थेचे आरोग्य विषयक सेवा अखंडीत सुरु राहण्यासाठी आश्रमाने दिलेल्या जमिनीत शासनाचे ग्रामीण रुग्णालयाचे काम लवकरच सुरु होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Keep away casteism - Shukdas Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.