Interview : सर्वांच्या हितामध्ये आपले हित माना - संतोष सावंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 04:59 PM2019-03-03T16:59:10+5:302019-03-03T18:08:32+5:30

सुसंस्कार व सुशिकवण समाजाला देणे हेच जीवनविद्येचे ध्येय आहे. जीवनविद्या इतरांच्या सुखाचा विचार करायला शिकवते अशा शब्दात जिवनविद्या मिशनचे प्रचारक संतोष सावंत यांनी मिशनचा परिचय दिला.

Interview: Believe your interest in the welfare of everyone - Santosh Sawant | Interview : सर्वांच्या हितामध्ये आपले हित माना - संतोष सावंत 

Interview : सर्वांच्या हितामध्ये आपले हित माना - संतोष सावंत 

Next

 - राजेश शेगोकार

अकोला: विकासाला विवेकाची जोड दिल्यासच मानवजात खº्या अथार्ने सुखी होईल. सर्वांमुळे मी आहे, जगतोय व सर्वांमध्ये सर्वेश्वर आहे आणि म्हणुनच मानवजात एक असून आपण सर्वांनी एकमेकांना सुखी करण्यासाठी आपले आयुष्य कारणी लावावे अश्ीा शिकवण सदगुरू वामनराव पै यांनी दिली होती. या शिकवणीची रूजूवात करण्यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. सर्वांच्या हितात आपले हित असून इतरांना यथाशक्ती सुखी करत करत स्वार्थ, परार्थ व परमार्थ साधता येतो आणि साधायचा असतो हे सुशिक्षण, सुसंस्कार व सुशिकवण समाजाला देणे हेच जीवनविद्येचे ध्येय आहे. जीवनविद्या इतरांच्या सुखाचा विचार करायला शिकवते अशा शब्दात जिवनविद्या मिशनचे प्रचारक संतोष सावंत यांनी मिशनचा परिचय दिला. अकोल्यातील उमरी येथे जिवन विद्या मिशनच्या संस्कार केंद्राचा प्रारंभ रविवारी झाला या निमित्ताने मिशनचे कार्य समजून घेण्यासाठी त्यांच्याशी ‘लोकमत’ ने संवाद साधला.


मिशनचे जीवनविद्या मिशन काय आहे?
-जीवनविद्या मिशन ही एक शैक्षणिक, सामाजिक आणि सेवाभावी संस्था आहे मिशन या शब्दाचा अर्थ एखाद्या कायार्ला झोकून देणे असा आहे. सद्गुरु श्री वामनराव पै यांनी निर्माण केलेल्या जीवनविद्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करून हे जग सुखी व्हावे व अखिल मानवजात सुखी व्हावी या उच्च ध्येयासाठी सद्गुरू व मिशनचे कार्यकर्ते निरपेक्षपणे गेली ६६ वर्षे कार्यरत आहेत. प्रल्हाददादा पै यांच्या मार्गदर्शनात सदगुरूंचा वारसा जतन केला जात असून जीवनविद्येचे तत्त्वज्ञान विज्ञाननिष्ठ, तर्कशुद्ध, अनुभवसिद्ध अभिनव व हमखास यशदायी आहे. हे तत्त्वज्ञान यशस्वी जीवन जगण्याचे शास्त्र सांगते आणि सुखी आणि समृद्ध जीवन जगण्याची कला शिकवते. हे तत्त्वज्ञान वैश्विक व मानव धर्मावर अधिष्ठीत अर्थात धमार्तीत आहे.
 
मिशनचे ध्येय कोणते?
जीवनविद्या मिशन प्रयत्नवादावर भर देते व राष्ट्र प्रगती, राष्ट्रोत्कर्ष व राष्ट्रशिस्त यांचा पुरस्कार करते. अज्ञान, अंधश्रध्दा आणि अहंकार यांचा बीमोड करून माणसाला माणसाशी माणसाप्रमाणे वागायला शिकवते. उद्योग हाच मोठा योग आहे हे सांगून समाज उपयुक्त काम प्रामाणिकपणे, कौशल्याने व कल्पकतेने करून, एकमेकांबद्दल करुणा ठेवून, कृतज्ञता भाव धरून, योग्य कौतुक करत करत सर्वांना सुखी करण्यासाठी उद्युक्त करते. महत्त्वाचे असे की जीवनविद्या विज्ञानाबरोबर प्रज्ञानाचे शिक्षण समाजाला देते.
 
मिशनमध्ये चमत्कारांना स्थान आहे काय?
-अजिबात नाही ! अनेक लोकांना असे वाटते की स्वामी, बाबा बुवा, भगत, फकीर दैवी समर्थाच्या बळावर आपल्या संसारातील सर्व अडचणी, संकट, रोग व दु:ख त्वरित दूर करतील. अशा या विकृत मनोवृत्तीतून व अंधश्रध्दा आणि त्यापाठोपाठ येणारा दैववाद यातूनच चमत्कारांबद्दल कमालीचे आकर्षण निर्माण होते. सदगुरू वामनराव पै यांनी प्रयत्नवाद शिकविला आहे त्यामुळे चमत्कार व चमत्कार करणारे लोक यांच्यापासून दूर राहून प्रयत्नवाद व शहाणपण यांची कास धरून स्वत:चे व इतरांचे कल्याण साधावे असे जीवनविद्या मिशन सर्वांना ठासून सांगते.
 
मानवता धमार्ची संकल्पना रुजवण्यात कोणत्या अडचणी येतात?
साध्या सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे ज्याने समाजाची सुरेख धारणा होते त्याला धर्म असे म्हणतात. तसे जीवनविद्येच्या मते कर्तव्य धमार्लाच खरा धर्म म्हणतात. आपलाच धर्म श्रेष्ठ व इतरांचा धर्म कनिष्ट आणि त्यातून निर्माण होणारा द्वेष, घृणा, तिरस्कार, वैमनस्य, कलह, दंगे धोपे, युद्ध, लढाया इत्यादी आणि निर्माण झालेले विचारप्रदूषण अडचणीचे ठरते. जीवनविद्या सांगते सर्व धर्म आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत. सर्वधर्म समभाव हा त्यावरील उपाय आहे.
 
आपली केंद्रे कुठे आहेत?
जीवनविद्या मिशनची संपूर्ण महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, कर्नाटक व गोवा मिळून ७० शाखा आहेत. तसेच (परदेशात) अमेरिका, कॅनडा, आॅस्ट्रेलिया इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. प्रत्येक शाखेत अनेक उपकेंद्र असून त्यात विविध उपक्रमांच्याद्वारे मिशनचा प्रसार आणि प्रचार होतो. तसेच कर्जत इथे जीवनविद्येचे वैश्विक ज्ञानपीठ आहे.
 
येत्या काही वर्षात नवीन संकल्प व अभियान
पर्यावरण यासारख्या अभियानात बेटी बचाओ, स्वच्छता, व्यसनमुक्ती जीवनविद्येचे ज्ञान हिंदी आणि इंग्रजी मधून उपलब्ध करण्याचा मानस आहे. तसेच सद्गुरुंचे ज्ञान, ग्रंथ मोबाईल वर उपलब्ध करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत. माध्यमांचा चा सुयोग्य वापर करून जीवनविद्येचा प्रचार आणि प्रसार जगभर व्हावा अशी अपेक्षा आहे. ग्राम समृद्धी अभियानात शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन करून त्यांच्या मन:स्थिती व परिस्थितीवर मात करण्यासाठी काय करायचे.

 

Web Title: Interview: Believe your interest in the welfare of everyone - Santosh Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.